येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. तत्पुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात शुक्रवारपासून (११ डिसेंबर) तीन दिवसीय सराव सामन्याची सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू कॅमरॉन ग्रीन (Cameron Green) याला दुखापत झाली आहे. तो ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा भाग आहे.
कॅमरॉन ग्रीनच्या डोक्याला लागला चेंडू
झाले असे की, सिडनी येथे चालू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला १९५ धावांचा आव्हान दिले. दरम्यान कॅमरॉन ग्रीन १०व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला गोलंदाजी करत होता. अशात ग्रीनच्या षटकातील एका चेंडूवर बुमराहने पावरफुल स्ट्रेट ड्राइव्ह लगावली. दुर्दैवाने तो चेंडू जाऊन सरळ ग्रीनच्या डोक्याला लागला. त्यानंतर ग्रीन वेदनेने मैदानावर कोसळला.
ग्रीनला दुखापत झाल्याचे पाहून नॉन स्ट्राईकर बाजूला उभा असलेला मोहम्मद सिराज लगेच त्याच्या जवळ गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाच्या मेडिकल टीमला मैदानावर बोलावण्यात आले. आणि ग्रीनची दुखापत गंभीर असल्याचे पाहून त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्यामुळे त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज पॅट्रिक रोवला (Patrick Rowe) पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले.
Traumatic blow to the head for Aussie Test hopeful Cameron Green while bowling. Has left the field, thankfully seemed alert/OK but will go through concussion assessment & likely checked for any possibility of facial fracture. Hope he’s OK pic.twitter.com/aPrHPAXomL
— NRL PHYSIO (@nrlphysio) December 11, 2020
पहिल्या सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियन खेळाडू जखमी
महत्त्वाचे म्हणजे, यापुर्वीच्या पहिल्या सराव सामन्यातही ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागल्याची घटना घडली होती. विल पुकोवस्की हे त्या खेळाडूचे नाव आहे. त्याला फलंदाजी करत असताना चेंडू लागला होता. याच दुखापतीमुळे पुकोवस्कीला दुसऱ्या सराव सामन्यात संधी देण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या-
जसप्रीत बुमराहची फलंदाजीतही कमाल; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात झळकाविले तुफानी अर्धशतक
IND Vs AUS A : साहाच्या अप्रतिम झेलने ऑस्ट्रेलियन फलंदाज तंबूत, व्हिडिओ होतोय व्हायरल