---Advertisement---

क्रिकेट ब्रेकिंग! भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर

On: शनिवार, फेब्रुवारी 27, 2021 1:08 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील चौथा सामना ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होत आहे. भारतीय संघ मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. तत्पुर्वी भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. बुमराहने बीसीसीआयला चौथ्या कसोटीत न खेळविण्याची विनंती केली होती. त्याने वैयक्तिक कारणामुळे शेवटच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. याचमुळे बीसीसीआयने त्याला अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघातून मुक्त केले आहे. बुमराहच्या जागी कोणत्याही दुसऱ्या खेळाडूला संधी न देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.

बुमराहच्या बाहेर जाण्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजीचा भार अनुभवी इशांत शर्माबरोबर कोणाच्या खांद्यावर पडतोय हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या भारतीय कसोटी संघामध्ये मोहम्मद सिराज, उमेश यादव व इशांत शर्मा हे तीनच वेगवान गोलंदाज आहेत. इशांतबरोबर सिराजला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

अहमदाबादची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीला साथ देणारी आहे. त्यात बुमराहला तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजीही मिळाली नव्हती. तसेच बुमराह प्रमाणेच शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांतनेही दुसऱ्या डावात एकही षटक टाकले नव्हते. त्यामुळे बुमराहच्या संघाबाहेर जाण्याने भारतीय संघाला कोणताही मोठा धोका नाही.

https://twitter.com/BCCI/status/1365565583169789954?s=20

चौथ्या कसोटीसाठी यातून निवडला जाणार भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्सर पटेल, वॉशिग्टंन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज,उमेश यादव

महत्त्वाच्या बातम्या-

मराठमोळा केदार जाधव बरसला! १० चौकारांसह चोपल्या ‘इतक्या’ धावा, आता SRH ला जिंकून देणार जेतेपद

तब्बल २ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘युनिव्हर्स बॉस’चे पुनरागमन, विंडीज टी२० संघात मिळाली जागा 

पराभवानंतर पाहुण्यांना आणखी एक धक्का! चौथ्या कसोटीपूर्वी ‘या’ धाकड खेळाडूची माघार, भरली मायदेशी उड्डाण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---