भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघ अनिर्णित करण्यात यशस्वी ठरला. मात्र सध्या भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. भारतीय संघातील जवळपास 10 खेळाडूंना दुखापत झाली आहे.
यामध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा देखील समावेश आहे. त्यामुळे ब्रिस्बेन येथे 15 जानेवारीपासून सुरु होणार्या चौथ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही, असे वृत्त मंगळवारी (12 जानेवारी) आले. यामुळे ट्विटर सध्या खूप प्रतिक्रिया येत आहेत.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्याने भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. कारण तो भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा त्याच्या हाती आहे. त्याचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. भारतीय मॅनेजमेंटला त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. कारण भारत आणि इंग्लंड संघात भारतामध्ये मालिका होणार आहे. तसेच अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
पीटीआय सोबत बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, तिसर्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ब्रिस्बेन येथे होणार्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. परंतू इंग्लंड विरुद्ध होणार्या मालिकेसाठी तो खेळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रीया आणि मीम्सचा पाऊस पडताना दिसत आहे. भारताचे इतरही खेळाडू जखमी झाले आहेत. यामध्ये रविंद्र जडेजा, केएल राहुल, हनुमा विहारी, उमेश यादव, मोहम्मद शमी, इत्यादी खेळाडूंचा सहभाग आहे.
जसप्रीत बुमराह चौथ्या सामन्यात खेळणार नाही, हे कळल्यानंतर सोशल मीडियावर उधाण आले आहे.
Waking up this morning to that Bumrah report.#Bumrah #JaspritBumrah #AUSvIND pic.twitter.com/WW6cRK1kPR
— Adhirajsinh Jadeja AJ 🇮🇳 (@AdhirajHJadeja) January 12, 2021
India pacer Jasprit Bumrah ruled out of fourth Test against Australia due to abdominal strain: BCCI Sources
— Press Trust of India (@PTI_News) January 12, 2021
#INDvAUS #brisbanetest #Bumrah #IndianCricketTeam #Jadeja#Shami #umeshyadav
*Jasprit Bumrah ruled out of 4th Test due to Abdominal Strain*
.
.
.
Le Shami,Ishant,Umesh,Jaddu,KL: pic.twitter.com/Oazx63kimi— nishadsatav13 (@nishadsatav13) January 12, 2021
#RaviShastri
India pacer Jasprit Bumrah ruled out of fourth Test against Australia due to abdominal strain: BCCI Sources
Meanwhile Indian fans:- pic.twitter.com/UVFLUG0oR7— Rajan Kumar (@krajan743) January 12, 2021
https://twitter.com/Stephan53457462/status/1348850072541270016
#JaspritBumrah is out of 4th Test at the #Gabba This series our 7 players got injured ! #AUSvsIND pic.twitter.com/DbySwC8v8L
— Prasoon Jain 😷 #WearMasks (@Prasoonjain31) January 12, 2021
https://twitter.com/Dhruv___12/status/1348853385970077696
#JaspritBumrah ruled out of 4th test vs Aus. Ye dukh kaahe khatam nai hota bey? 😅 pic.twitter.com/KrmCigBKLC
— Kumar_Ankesh🇮🇳 (@AnkeshK69975862) January 12, 2021
https://twitter.com/dhoninjay/status/1348976496673636356
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या मालिकेत तीन कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये त्याने 29.39 सरासरीने 11 गडी बाद केले आहेत. त्याने या मालिकेत आतापर्यंत 117.4 षटके गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट इतिहासातील सर्वात कंजूस गोलंदाज, सलग २१ ओव्हर टाकल्या होत्या मेडन
अजिंक्य रहाणेने ‘ही’ चाल खेळली म्हणून टीम पेनवर आला दबाव, दिग्गजाने मांडले मत