भारताचा टी20 विश्वचषक विजेता संघ गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचला. त्यानंतर सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले, जेथे त्यांनी पंतप्रधानांसोबत नाश्ता केला.
दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो त्याची पत्नी आणि पंतप्रधान मोदींसोबत दिसत आहे. या चित्रात मोदी बुमराहच्या मुलासोबत मस्ती करताना दिसत आहेत.
जसप्रीत बुमराहच्या मुलाचं नाव अंगद असून त्याचा जन्म 4 सप्टेंबर 2023 रोजी झाला होता. बुमराहनं फोटोच्या कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लिहिलं, ” आज सकाळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आमंत्रित होणं माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. या क्षणांसाठी आणि पाहुणचारासाठी मोदी सरांचं खूप खूप आभार.”
It was an honour to be invited to our honourable Prime Minister’s residence this morning. Thank you so much for your warmth and hospitality sir @narendramodi 🇮🇳 pic.twitter.com/xp8YBc3gD9
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) July 4, 2024
नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी संपूर्ण भारतीय संघाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत फोटोशूट केलं. टी20 विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाचं अभिनंदन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी टीम इंडिया बार्बाडोसमध्ये असताना पंतप्रधानांनी फोनवर बोलून भारतीय खेळाडूंना वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.
पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचले. तेथून संपूर्ण टीम मुंबईला रवाना झाली. मुंबईतील मरीन ड्राईव्हवर भारतीय संघाची विजय परेड आयोजित करण्यात आली आहे. यासाठी खुली बस तयार करण्यात आली असून, या बसमध्ये चढून टीम इंडियाचे सर्व खेळाडू चाहत्यांचं अभिनंदन स्वीकारतील. हा रोड शो नरिमन पॉईंटवर सुरु होऊन वानखेडे स्टेडियमपर्यंत चालणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतप्रधान मोदींनी वर्ल्डकप ट्रॉफी हातात न घेता रोहित-द्रविडचा हात का धरला? जाणून घ्या
अभिमानाचा क्षण! मुख्यमंत्र्यांचं खास आमंत्रण, रोहित शर्मासह या खेळाडूंना विधानसभेत भेटीसाठी बोलावलं
टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांची अलोट गर्दी, तर कांगारुंना कोणीच विचारलं नव्हतं