दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये १९ जानेवारी पासून ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद केएल राहुलला (Kl Rahul) सोपवण्यात आले आहे, तर संघाचे उपकर्णधारपद जसप्रीत बुमराहला (Jasprit bumrah) सोपवण्यात आले आहे. आता वनडे मालिका सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक असताना जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. आता तो वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार का? याबाबत जसप्रीत बुमराहने प्रतिक्रीया दिली आहे.
मोहम्मद सिराजच्या फिटनेसबाबत बोलताना जसप्रीत बुमराह म्हणाला की, “मला वाटत आहे की, तो आता फिट आहे. तो आता आमच्यासोबत सराव करतोय. सराव करताना असं मुळीच वाटलं नाही की, तो फिट नाहीये. आशा करतो की, असाच फिट राहील. मला अजूनही लेटेस्ट अपडेट काय आहे, हे माहीत नाहीये. परंतु, सर्वकाही ठीक दिसून येत आहे.”
अधिक वाचा – राडाच ना! भर मैदानात एल्गर-सिराज भिडले, वाद थांबवण्यासाठी कर्णधार केएल राहुलचा हस्तक्षेप
मोहम्मद सिराज दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. त्याच्या ऐवजी उमेश यादवला संधी देण्यात आली होती.
व्हिडिओ पाहा – क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
तसेच ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, सेंच्युरियनच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता, तर जोहान्सबर्गच्या मैदानावर पार पडलेला दुसरा कसोटी सामना दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता. तसेच अंतिम कसोटी सामन्यात देखील भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. ही मालिका दक्षिण आफ्रिका संघाने २-१ ने आपल्या नावावर केली.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल २०२२: अहमदाबादने निवडली आपली ‘त्रिमूर्ती’; हार्दिक-राशिदसह ‘या’ युवा फलंदाजावर लावला दाव
नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार?
हे नक्की पाहा: