आयपीएल २०२२ (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला होणार आहे. पुढच्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी स्पर्धेत सामील होणार आहेत. मेगा लिलावापूर्वी सर्व संघांना चार खेळाडूंना संघात रिटेन करण्याची परवानगी मिळाली होती. या दोन नवीन फ्रेंचायझींना देखील तीन खेळाडू निवडता येणार आहेत. अशात अहमदाबाद फ्रेंचायझीने त्यांचे तीन खेळाडू निवडल्याचे समजते आहे.
मुंबईचा माजी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya), सनरायझर्स हैदराबादसाठी उत्कृष्ट प्रदर्शन केलेला राशिद खान (Rashid Khan) आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा युवा खेळाडू शुबमन गिल (Shubman Gill) हे पुढच्या हंगामात अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसतील. तत्पूर्वी अहमदाबादने त्यांचा सपोर्ट स्टाफदेखील निवडला आहे. त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहरा आणि दक्षिण अफ्रिकेचे दिग्गज गॅरी कर्स्टन यांचा समावेश आहे. तसेच इंग्लंडेचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी देखील अहमदाबाद फ्रेंचायझीचे संचालक असतील. इंग्लंडची कंपनी सीवीसी कॅपिटल्सने मोठी किंमत मोजून अहमदाबाद फ्रेंचायझीची मालकी मिळवली होती. आपला उर्वरित संघ बनविण्यासाठी अहमदाबाद फ्रेंचायझीकडे आता ५३ कोटी रुपये शिल्लक असतील.
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने यासंदर्भात माहिती दिली आहे. वृत्तानुसार, या तीन खेळाडूंना अहमदाबाद फ्रेंचायझीने करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद फ्रेंचायझीने हार्दिक पंड्या आणि राशिद खान यांना संघात सामील करण्यासाठी १५-१५ करोड रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर, युवा शुबमन गिलला अहमदाबाद फ्रेंचायझीत सहभागी होण्यासाठी सात करोड रुपये दिले जाणार आहेत. हार्दिक या संघाचा कर्णधार असेल. यापूर्वी हार्दिकने कोणत्याच संघाचे नेतृत्व केले नाहीये, अशात त्याच्यापुढे एक नवीन आव्हान असणार आहे. दोन्ही नवीन फ्रेंचायझींना त्यांनी निवडलेल्या खेळाडूंची माहिती देण्यासाठी २२ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला गेला आहे.
दरम्यान, या तिन्ही खेळाडूंचा यापूर्वीचा आयपीएलमधील इतिहास पाहिला, तर हे तिघेही प्रत्येकी एका एका संघासाठी खेळले आहेत. हार्दिक यापूर्वी आयपीएलमध्ये फक्त मुंबई इंडियन्ससाठी खेळला आहे, पण सततच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला संघाने रिलीज केले. राशिद खान यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता आणि त्याव्यतिरिक्त तो कोणत्या इतर संघासाठी आयपीएल खेळला नव्हता. तसेच, शुबमन गिल देखील आयपीएल पदार्पणापासून कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळत आला होता.
महत्वाच्या बातम्या –
बिग बॅशमध्ये इतिहास घडणार! ‘हा’ भारतीय करणार पदार्पण; फिंचने दिली संधी
नेतृत्व सोडल्यानंतर दिसली विराटची पहिली झलक; सराव सत्राच्या शुभारंभाची क्षणचित्रे व्हायरल
“हा विराटने बनविलेला संघ, त्यामुळे…” विश्वविजेत्या खेळाडूची रोचक प्रतिक्रिया
व्हिडिओ पाहा –