जोहान्सबर्ग। काल दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने २८ धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात सर्वांना आश्चर्य वाटले ते जसप्रीत बुमराहने केलेल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणानंतरही पंचांनी षटकार दिला याचे.
त्या चेंडूवर झाले असे की जेव्हा भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरने चेंडू उंच हवेत मारला तेव्हा या चेंडूवर षटकार जाऊ नये म्हणून बुमराहने उडी मारून तो चेंडू अडवला. पण उडी मारण्यापूर्वी बुमराहाचा पाय बाउंड्री लाईनला लागला होता. त्यामुळे जरी चेंडू हातात असताना बुमराह हवेत होता, तरी या चेंडूवर आयसीसीच्या बदललेल्या नियमाप्रमाणे पंचांनी षटकार दिला.
I liked a @YouTube video https://t.co/HdMBGOpCLN Bumrah ka shandar catch Ind vs sa WhatsApp status
— Arvindramji Yadav (@ArvindY25662089) February 19, 2018
मात्र हा बदललेला निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही न कळल्याने त्याने याबाबतीत पंचांना विचारणा केली. त्यावर पंचानी त्याला नियम समजावून सांगितला.
असा आहे आयसीसीचा बदललेला नियम:
क्षेत्ररक्षकाचा चेंडूला स्पर्श होण्याआधी त्याचा बाउंड्री लाईनच्या कोणत्याच भागाशी संबंध येता कामा नये.
आयसीसीने नुकतेच काही नियम बदलले आहेत. त्यातील हा एक महत्वाचा निर्णय होता. त्याचबरोबर धावबादच्या नियमातही आयसीसीने बदल केला आहे.