जसप्रीत बुमराह भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचा लिडर आहे. मात्र त्यानं गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांवरुन वाटत आहे की, त्याच्या मनात कर्णधार बनण्याची इच्छा आहे. जसप्रीत बुमराहनं 1 कसोटी आणि 2 टी20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे.
जसप्रीत बुमराहनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र सध्या तो संघाचा ना कर्णधार आहे ना उपकर्णधार. त्यानं एकदा स्वत:ला सर्वात उत्तम कर्णधार म्हटलं होतं. आता त्यानं, गोलंदाज ‘स्मार्ट’ असतात कारण ते बॅटमागे लपत नाहीत, असं म्हटलं आहे. बुमराहच्या मते गोलंदाज संघाचं नेतृत्व करण्यासाठी अगदी योग्य असतात.
जसप्रीत बुमराहनं कपिल देव आणि इमरान खान सारख्या गोलंदाजांचं उदाहरण दिलं आहे, ज्यांनी आपल्या नेतृत्वात संघाला विश्वचषक जिंकवून दिला. सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आहे, ज्यानं त्याच्या नेतृत्वात संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकवून दिला. जसप्रीत बुमराह ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाला की, त्याच्या मते गोलंदाज चतुर असतात कारण त्यांना फलंदाजांना बाद करायचं असतं.
बुमराह म्हणाला, “गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागते. त्यांना बॅटच्या मागे किंवा सपाट खेळपटीच्या आड लपता येत नाही. ते नेहमी निशाण्यावर असतात. जेव्हा संघ एखादा सामना हरतो, तेव्हा मुख्यत्वे गोलंदाजांनाच जबाबदार धरलं जातं. म्हणून हे कठीण काम आहे. आपण पॅट कमिन्सला चांगली कामगिरी करताना पहिलं आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी वकार युनूस आणि वसीम अक्रम यांना कर्णधार म्हणून पाहिलं होतं. कपिल देवनं आपल्याला विश्वचषक जिंकवून दिला आहे. इमरान खाननंही पाकिस्तानसाठी विश्वचषक जिंकला आहे. म्हणून गोलंदाज हुशार असतात.”
हेही वाचा –
मोहम्मद शमीचं भारतीय संघात पुनरागमन कधी होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट
जर केकेआरनं रिटेन केलं नाही तर कोणत्या संघाकडून खेळेल रिंकू सिंह? स्वत: दिलं उत्तर
“याआधी पंत माझ्या कॅप्टन्सीखाली खेळलाय, आता मला त्याच्या…”, भारतीय खेळाडूकडून कौतुक