---Advertisement---

बुमराह नंबर वन! पाकिस्तानी गोलंदाजाला मागे टाकत ‘जस्सी’ टॉपवर

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, यात शंका नाही. खेळाच्या तिन्ही प्रकारात आपला ठसा उमटवणाऱ्या या उजव्या हाताच्या गोलंदाजाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२१-२०२३ हंगामात आतापर्यंत सर्वाधिक बळी घेऊन अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने या यादीत पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला मागे सोडण्याची कामगिरी केली.

जसप्रीत बुमराहने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळे, २०२१-२०२३ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये बुमराह आतापर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याचा फॉर्म पाहता यात आश्चर्य करण्यासाठी कोणतीही गोष्ट नाही. या हंगामात बुमराहने तीन वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

बुमराहने गेल्या वर्षी नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेतले होते. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच बळी मिळवलेले. त्यानंतर मार्चमध्ये बेंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध २४ धावा देत पाच बळी अशी प्रभावी कामगिरी केली होती. त्याच्या नावावर आतापर्यंत ४५ बळी आहेत.

या यादीमध्ये पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी ४१ बळींसह दुसऱ्या, इंग्लंडचा जेम्स अँडरसन ४० बळींसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन ३९ बळींसह चौथ्या तर, श्रीलंकेचा रमेश मेंडींस ३८ बळीसह पाचव्या क्रमांकावर आहे. बुमराह गोलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत सध्या चौथ्या स्थानावर विराजमान आहे. तर वनडे तो दुसऱ्या स्थानावर अनेक दिवसांपासून टिकून आहे. बुमराहने जूलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध एकमेव कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते. मात्र, भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान

चांगला फॉर्म, सर्वाधिक धावा; तरीही आशिया चषकासाठी दुर्लक्षित राहिले ‘हे’ दोघे भारतीय

पाकिस्तानी खेळाडू यावर्षी भारतात क्रिकेट खेळणार? स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणार विशेष सामना

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---