---Advertisement---

लवकरच चाहत्यांना मैदानात होणार बुमराहचे दर्शन! पोस्ट शेअर करत दिली इन्जूरी अपडेट

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 4:19 PM
Jasprit-Bumrah-Training
---Advertisement---

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. याच कारणामुळे तो मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळू शकला नाही. बुमराह आशिया कपमध्ये न खेळणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. पण, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. बुमराहने टीम इंडियात पुनरागमनाची तयारी सुरू केली आहे. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचे पुनर्वसन पूर्ण करत आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/ChlrnNHLOoi/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओसोबत बुमराहने कॅप्शन लिहिले आहे की, “कोणताही अडथळा मोठा नसतो.” व्हिडिओमध्ये बुमराह अडथळ्यावरून उडी मारताना दिसत आहे. तसेच तो मोठ्या चेंडूने गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. त्याचा सराव पाहता बुमराह मैदानावर पुनरागमन करण्यापासून दूर नाही असे दिसते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लोक सगळं विसरून जातील’, विराटच्या खराब फॉर्मवर शास्त्री गुरुजींची विशेष टिपण्णी
एशिया कप। एक वेळा नाही तब्बल २८वेळा सईद किरमानी खेळले भारत-पाकिस्तान या दोन्हीकडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---