भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी अनिल कुंबळे एक मानले जातात. अठरा वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असलेल्या कुंबळे यांनी भारतीय संघासाठी अनेक महत्वाचे सामने जिंकवून दिले आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर अजूनही भारताला जागतिक दर्जाचा लेग स्पिनर गोलंदाज मिळालेला नाही. मात्र नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात जसप्रीत बुमराह कुंबळे यांच्या प्रमाणेच लेग स्पिन गोलंदाजी करताना दिसतोय.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कुंबळे यांच्या गोलंदाजीची नक्कल करत आहे. सदर व्हिडिओमध्ये बीसीसीआयने कुंबळे आणि बुमराहच्या गोलंदाजीची तुलना देखील केलेली आहे. काही मिनिटातच हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून क्रिकेट रसिकांनी देखील यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
We have all seen @Jaspritbumrah93's fiery yorkers and sharp bouncers. Here’s presenting a never-seen-before version of the fast bowler.
Boom tries to emulate the legendary @anilkumble1074's bowling action and pretty much nails it! pic.twitter.com/wLmPXQGYgC
— BCCI (@BCCI) January 30, 2021
कुंबळे यांच्या कामगिरीचा विचार केला असता, ते भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम मॅच विनर खेळाडूंपैकी एक आहेत. कुंबळे यांनी 132 कसोटी सामन्यात 619 बळी मिळवले आहेत. विशेष म्हणजे एका डावात 10 गडी बाद करण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावे आहे. हा विक्रम त्यांनी 1999 साली पाकिस्तान विरुद्ध केलेला होता.
कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक बळी मिळवण्याच्या बाबतीत कुंबळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये देखील कुंबळे यांनी आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे. कुंबळे यांनी 271 वनडे सामन्यात 337 बळी मिळवले आहेत.
कुंबळे यांच्याप्रमाणेच बुमराह देखील आगामी काळात भारतीय संघासाठी सुपरस्टार खेळाडू बनू शकतो. बुमराहने आपल्या छोट्याशा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बुमराहने भारतासाठी 67 वनडे सामन्यात 108 आणि 50 टी20 सामन्यात 59 बळी घेतलेल्या आहेत. यासोबतच त्याने 17 कसोटी सामने खेळलेले असून त्यात 79 बळी मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! सौरव गांगुलीला दुसऱ्या अँजिओप्लास्टीनंतर हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज
चालू सामन्यात अंपायरला शिवीगाळ करत खेळाडूने ओढवले संकट, झाला लाखोंचा दंड