भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या वेगळ्याच लयीत आहे. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्याच्या वनडे मालिकेत तब्बल १५ बळी घेत त्याने एक नवा विक्रम रचला.
या विक्रमाचे आणखी एक बक्षीस म्हणजे बुमराह गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीत ४ स्थानी आला आहे. यावर्षी जून २०१७ मध्ये बुमराह २४ व्या स्थानी होता आणि ते त्याचे सर्वोत्तम होते. आता तब्बल २७ क्रम वर येत त्याने ४ स्थान पटकावले आहे. या मालिकेतील ३ ऱ्या वनडे सामन्यात आपली सर्वोत्तम ५-२७ कामगिरी करत मालिकावीर पुरस्काराचा देखील मानकरी ठरला.
एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड प्रथम, साऊथ आफ्रिकेचा इम्रान ताहीर दुसऱ्या आणि मिशेल स्टार्क तिसऱ्या क्रमांकावर आहे.