भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच त्याची पत्नी संजना गणेशन ही देखील प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेसेंटेटर आहे. हे दोघेही सध्या यूएईमध्ये आहेत. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघासोबत आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. तर संजना गणेशन देखील आयपीएल स्पर्धेत समालोचन करताना दिसून येत आहे. तसेच मिळालेल्या रिकाम्या वेळात हे दोघेही एकत्र वेळ घालवत असतात, ज्याचे फोटो ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर करत असतात.
दरम्यान संजना गणेशनने बीचवर मस्ती करत असतानाचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. जे चर्चेचा विषय ठरत आहे.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी सोमवारी (४ ऑक्टोबर) सूर्यास्त पाहण्यासाठी यूएईच्या बीचवर हजेरी लावली होती. जिथे त्यांनी सूर्यास्ताच्या वेळी फोटो शूटदेखील केले. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. या फोटोवर तिने कॅप्शन म्हणून ‘सनसेट ऑफ माय माईंड’ असे लिहिले आहे. या अप्रतिम फोटोची खासियत म्हणजे हे फोटो जसप्रीत बुमराहने क्लिक केले आहेत. तर इतर फोटोमध्ये ती बीचवर मस्ती करताना दिसून येत आहे. या फोटोवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देत आहेत.
कोण आहे संजना गणेशन?
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक मॉडेल आणि अँकर आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटेटर म्हणून कार्यरत आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या लिलावात देखील तिने होस्टची भूमिका पार पाडली होती. तसेच बऱ्याच फुटबॉल आणि बॅडमिंटन स्पर्धांमध्ये देखील तिने होस्टची भूमिका पार पाडली आहे.
https://www.instagram.com/p/CUnDd-VoTIe/?utm_medium=copy_link
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघांमध्ये रंगणार निर्णायक सामना
जसप्रीत बुमराह राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेतील ५१ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामन्यात राजस्थान रॉयल्स संघ जर पराभूत झाला तर हा संघ जवळजवळ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल. तसेच जर मुंबई इंडियन्स संघ या सामन्यात पराभूत झाला तर मुंबई इंडियन्स संघाचा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग आणखी कठीण होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोक्याच्या क्षणी ९.२५ कोटीच्या खेळाडूकडून घोडचूक, मग काय सीएसकेने सामनाही गमावला अन् अव्वल स्थानही
“खूप शांती आहे आज”, तब्बल ५ महिन्यांनी विराट कोहलीचे पंजाब किंग्जला जोरदार प्रत्युत्तर