---Advertisement---

MI vs SRH: जसप्रीत बुमराह इतिहास रचणार! ‘या’ स्टार खेळाडूचा रेकाॅर्ड धोक्यात?

On: बुधवार, एप्रिल 23, 2025 6:00 PM
---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संघात खेळला जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघ हैदराबाच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.

जसप्रीत बुमराहच्या निशाण्यावर एक मोठा रे्काॅर्ड असेल. जर बुमराहने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या तर तो लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) मागे टाकून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल. मलिंगाने आयपीएलमध्ये मुंबईसाठी 122 डावांमध्ये 7.1 च्या इकॉनॉमी रेटने 170 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 6 वेळा 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर बुमराहने 137 डावांमध्ये 7.3च्या इकॉनॉमीने 169 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोनदा 4 विकेट्स आणि दोनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत 7 सामन्यांपैकी फक्त 2 विजय मिळवले आहेत. गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने 2 घरच्या सामन्यातही पराभव पत्करला आहे. वानखेडे स्टेडियमच्या अवघड खेळपट्ट्यांवर मुंबईने त्यांना 4 विकेट्सने पराभूत केले आणि या सामन्यात आव्हानात्मक परिस्थितीसमोर त्यांच्या कमकुवतपणा उघड झाल्या. सनरायझर्सच्या फलंदाजांनी सपाट खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी केली आहे.

सनरायझर्सच्या फलंदाजीची जबाबदारी त्यांच्या सलामी जोडी अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ट्रॅव्हिस हेडवर (Travis Head) असेल. पॉवरप्लेमध्ये त्यांचे यश संघासाठी खूप महत्वाचे आहे. अभिषेकने गेल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध 55 चेंडूत 141 धावा केल्या, जो या आयपीएलमधील कोणत्याही फलंदाजाने केलेला सर्वोच्च धावसंख्या आहे. हेडच्या कामगिरीत सातत्य नसणे ही चिंतेची बाब आहे. सनरायझर्सना त्यांच्या ऑस्ट्रेलियन स्टारकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल कारण या सामन्यातील पराभवामुळे संघाची परिस्थिती आणखी बिकट होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---