भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नुकतेच संघात पुनरागमन केले. शनिवारी (3 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, पावसामुळे त्याला एकही चेंडू टाकण्याची संधी मिळाली नाही. अशात रविवारी (3 सप्टेंबर) अशी माहिती समोर येत आहे की, बुमराह आशिया चषक सुरू असतानाच अर्ध्यातून मायदेशात परतला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. भारत आणि नेपाळ यांच्यातील हा सामना समोवारी (4 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. पण बुमराह या सामन्यापूर्वीच मुंबईला परतल्याचे सांगितले जात आहे. याच कारणास्तव नेपाळच्या फलंदाजांना बुमराहच्या घातक यॉर्कर्सचा सामना करावा लागणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. असे असले तरी, आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीसाठी बुमराह पुन्हा एकदा संघासोबत जोडला जाईल, असेही सांगितले गेले आहे. त्याने मुंबईला परतण्याचा निर्णय वैयक्तिक कारणास्तव घेतल्याचेही सांगण्यात आले आहे.
आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या होत्या. (Jasprit Bumrah won’t be available for the match against Nepal due to personal reasons)
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 । मेहदी हसन आणि नजमूल शांतोची वादळी शतके! अफगाणिस्तानसमोर बांगलादेशचे मोठे लक्ष्य
मोठी बातमी! तिन्ही फॉरमॅट जावणारा पाकिस्तानी दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त! शेअर केली सविस्तर पोस्ट