आशिया चषक 2023 मध्ये भारत पाकिस्तान सामना चालू असताना पावसाना हा सामना थांबवला. काही वेळ वाट पाहील्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्ण झाली होती. परंतु, पाकिस्तानच्या फंलदाजीच्यावेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामळे नाइलाजाने हा सामना रद्द करण्यात आला.भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने सामना रद्द झाल्यानंतर भारताला याचे नुकसान कसे झाले हे सांगितले. संपूर्ण समीकरण स्पष्ट करताना त्याने सांगितले की भारताने सामना जिंकला असता.
इरफान पठाण (Irfan Pathan) ने ट्विटद्वारे सांगीतले की, जर पाकिस्तानने फलंदाजी करताना 66 धावांत 4 विकेट्स गमावल्या असत्या तर भारतीय संधघाने वेगवान गोलंदाजांच्या बळावर सामना जिंकला असता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघ 48.5 षटकात 266 धावांवर सर्वबाद झाला. भारताने 14.1 षटकात 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. संघाचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाल्याने भारताला फारशी धावा करता येणार नसल्याचे दिसत होते.
पुढे त्याने सांगितले की, ईशान किशन आणि हार्दिक पंड्या या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचवले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. त्याचवेळी ईशानने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. त्याचवेळी इरफान पठाणने एक ट्विट करून भारताच्या विजयाचे संपूर्ण गणित स्पष्ट केले.
इरफानने त्याच्या ट्वीटमध्ये लिहले का, “पाकिस्तानी फिरकीपटूंनी 21 षटकांत एकही विकेट न घेता 133 धावा दिल्या ही बाब गेमचेंजर होती.” इरफानने पुढे लिहले, “जर भारताने गोलंदाजी केली असती आणि पाकिस्तानने 66 धावांवर 4 विकेट गमावल्या असत्या, तर भारताने वेगवान गोलंदाजांसह चालू ठेवले असते कारण त्यांच्याकडे 4 वेगवान गोलंदाजांचे स्वातंत्र्य होते तर पाकिस्तान तीन वेगवान गोलंदाजांसह खेळत होता. त्यामुळे मला वाटते की असमान उसळी असलेल्या खेळपट्टीवर सरासरीपेक्षा जास्त धावा केल्यानंतर पावसामुळे भारताची निराशा झाली.” (indian cricketer irfan pathan told why india team disapponted)
महत्वाच्या बातम्या-
“भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला असता”, शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य
इरफानने उडवली पाकिस्तानची खिल्ली, PAK चाहत्यांना येईल राग, तर भारतीय क्रिकेटप्रेमी होतील खुश; लगेच वाचा