भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना नागपूर येथे खेळला जात आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल अडीच तासानंतर सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला. आठ षटकांच्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला 90 धावांवर रोखले. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने या सामन्याद्वारे तीन महिन्यानंतर पुनरागमन केले. त्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचचा उडवलेला त्रिफळा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
B. O. O. M! ⚡️ ⚡️@Jaspritbumrah93 strikes to dismiss Aaron Finch with a cracker of a yorker. 👍 👍#TeamIndia are chipping away here in Nagpur! 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/LyNJTtkxVv
Don’t miss the LIVE coverage of the #INDvAUS match on @StarSportsIndia pic.twitter.com/omG6LcrkX8
— BCCI (@BCCI) September 23, 2022
इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या दुखापतीनंतर जसप्रीत बुमराह प्रथमच भारतीय संघासाठी खेळत होता. आठ षटकांच्या या सामन्यात प्रत्येक गोलंदाज केवळ दोन षटके टाकू शकत होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया झाडातील पाचवे षटक टाकण्याची जबाबदारी त्याला दिली. त्याने देखील कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत 31 धावांची आक्रमक खेळी करून खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचचा षटकाच्या अखेरचा चेंडूवर अप्रतिम यॉर्करवर त्रिफळा उडवला. दुसऱ्या षटकातही गोलंदाजीला आल्यानंतर त्याने स्टीव्ह स्मिथलाही लोटांगण घालण्यास भाग पाडले.