---Advertisement---

जसप्रीत बुमराहचे दमदार पुनरागमन, पण RCBविरुद्ध खेळणार की नाही?

On: रविवार, एप्रिल 6, 2025 6:22 PM
---Advertisement---

जसप्रीत बुमराह खूप मोठ्या वेळानंतर मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये परत आला आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचाईजीने स्वतः या गोष्टीची माहिती दिली आहे. तसेच मुंबईच्या चाहत्यांनाही आनंदाची बातमी सांगितली आहे. जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान दुखापत झाली होती आणि त्यामुळे आत्तापर्यंत आयपीएल 2025 चे 4 सामने तो खेळू शकला नाही. आता सर्वांच्या आवडत्या बूम-बूम बुमराहने पुनरागमन केले आहे. पण हा प्रश्न उपस्थित होत आहे की, मैदानात तो केव्हा पुनरागमन करेल? तो 7 एप्रिल रोजी होणाऱ्या आरसीबी विरुद्ध सामन्यात खेळणार आहे का? की चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची अजून प्रतीक्षा करावी लागेल?

जसप्रीत बुमराहने मुंबईच्या स्क्वाडमध्ये एन्ट्री तर केली आहे, पण कदाचित तो आरसीबी सोबतचा सामना खेळू शकणार नाही. आत्ताच एका मीडिया रिपोर्टनुसार बुमराहला मैदानात उतरण्यापूर्वी पहिल्यांदा 2 सराव सामने खेळून त्याची फिटनेस सिद्ध करावी लागेल. त्याचं पुनरागमन पूर्णपणे या गोष्टीवर अवलंबून असणार आहे की तो सराव सत्रादरम्यान कसा खेळतो. आत्तापर्यंत हे सिद्ध झाले नाही की, बुमराह नक्की कधी खेळेल. पण 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात तो नक्की खेळू शकतो ही माहिती समोर आली आहे. पण आरसीबी विरुद्ध सामन्यात तो खेळेल यामध्ये शंकाच आहे.

एका मीडिया रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे की, जसप्रीतने मुंबई इंडियन्स संघामध्ये आताच एका इंट्रा स्क्वाडमध्ये सहभाग घेतला होता. तो आजही एका वेगळ्या सराव सामन्यात भाग घेणार आहे. तसेच दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सामन्यात रोहित शर्मा गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे खेळू शकला नव्हता. पण आता चर्चा उपस्थित होत आहेत की, रोहित आरसीबी विरुद्ध सामन्यात मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकतो. सध्या मुंबईने 4 सामन्यात फक्त 1 सामना जिंकला आहे आणि पॉईंट्स टेबलमध्ये ते सातव्या क्रमांकावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---