मुंबई। पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू भारतावर नियमित टीका करत असतात. यात शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर आघाडीवर आहेत. एखादे वादग्रस्त विधान करून सतत चर्चेत राहतात. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज जावेद मियांदाद यांनी देखील भारताबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडविण्यात आली होती. याच मियांदाद यांचा आज (12 जून) वाढदिवस आहे.
2019 साली जम्मू काश्मीर संबंधित 370 कलम हटवले होते. त्यानंतर पाकिस्तानला याची चांगलीच मिरची झोंबली. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानाचा माजी कर्णधार जावेद मियादाद नाराज झाले आणि भारतावर आक्रमण करण्याचे विधान केले होते. तसेच भारताला ‘भित्रा देश’ असे म्हणाले होते.
एका मुलाखतीत जावेद मियादाद यांना काश्मीरच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले, “आपल्याकडे जर शस्त्र बाळगण्याचा परवाना असेल तर आपल्याला आक्रमण करायला हवे. आपण जर बचाव करण्याचा प्रयत्न केला तर मारले जावू.”
जावेद मियांदाद यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय संदेश देणार? असे विचारल्यावर ते म्हणाले, ” मी यापूर्वी सांगितले आहे की, भारत हा भित्रा देश आहे. आतापर्यंत यांनी काय केले. परमाणू बॉम्ब असेच बनवले नाही. तो आक्रमण करण्यासाठी बनवले आहे. आम्हाला संधी मिळाली की याचा वापर करू.”
जावेद मियादाद पाकिस्तानचे सर्वश्रेष्ठ फलंदाजापैकी एक. त्यांनी पाकिस्तानकडून खेळताना 124 कसोटी सामन्यात 52.57 च्या सरासरीने 8832 धावा केल्या. यात 23 शतके ठोकली. 233 वनडे सामन्यात 41.70 च्या सरासरीने 7381 धावा केल्या. यात 8 शतके आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. असे असले तरी मैदानाबाहेरील मियादाद कायमच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा-
स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!