पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाॅंदादने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व फलंदाज अहमद शहजादवर जोरदार टीका केली आहे. अहमद शहजाद गेले काही महिने संघातून बाहेर आहे. याच पार्श्वभुमीवर शाहजादने भाष्य केले होते की, तो अजून पाकिस्तानकडून कमीतकमी १२ वर्ष क्रिकेट खेळू शकतो.
यावर जावेद मियाॅंदाद यांनी जोरदार निशाणा साधताना टीका केली आहे. “१२ वर्ष काय तु २० वर्षही पाकिस्तानकडून क्रिकेट खेळू शकतो. परंतु यासाठी तुला जबरदस्त कामगिरी करावी लागेल. जर तुम्ही कामगिरी करत असाल तर तुम्हाला कुणीही संघातून काढू शकत नाही. खेळाडूंना संघातून तेव्हा काढले जाते जेव्हा ते कामगिरी करत नाहीत.” अशी टिपण्णी मियाॅंदाद यांनी केली आहे.
यावेळी मियाॅंदाद यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही खरपुस समाचार घेतला आहे. “पाकिस्तान क्रिकेट संघात एकही खेळाडू आहे का जो भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका किंवा न्यूझीलंडच्या खेळाडूंची जागा घेऊ शकतो? त्या संघांमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानचा एकतरी फलंदाज लायक आहे का? आपल्या चांगले गोलंदाज आहेत परंतु फलंदाज नाहीत,” असे यावेळी मियाॅंदाद म्हणाले.
खेळाडूंनी जबाबदारपणे बोलायला हवं. त्यांनी सतत कामगिरीतूनच उत्तर द्यायला हवं, असेही मियाॅंदाद यावेळी म्हणाले.
मियाॅंदाद पाकिस्तानकडून १२४ कसोटी व २३३ वनडे सामने खेळले असुन त्यांनी कसोटीत ८८३१ व वनडेत ७३८१ धावा केल्या आहेत.
ट्रेडिंग घडामोडी-
– तर विश्वचषकाची सेमीफायनलच ठरु शकते धोनीचा अंतिम सामना
– इंग्रजीवरुन झालं पाकिस्तानी खेळाडूचं जगभरात हसु, तुझे ट्विट वहिनी करते का?
– बीडचा सुपूत्र संजय बांगरने नाकारली बांगलादेशची मोठी ऑफर
– विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी