जपानची राजधानी टोकियो येथे गेल्या काही दिवसांपासून टोकियो ऑलिंपिक २०२० चा थरार रंगला आहे. खेळाच्या या महाकुंभात भारतीय क्रिडापटूही धमाकेदार प्रदर्शन करताना दिसत आहेत. आतापर्यंत भारतीय क्रिडापटूंनी २ पदकांची कमाई केली असून हॉकी खेळातून पदाकाच्या आशा कायम आहेत. अशात बुधवार रोजी (०४ ऑगस्ट) भालाफेक खेळात नीरज चोप्रा याने धडाकेबाज प्रदर्शन करत सर्वांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
नीरजने पहिल्याच प्रयत्नात कमालीचा थ्रो फेकला आहे. त्याने तब्बल ८६.५५ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता त्याचा अंतिम सामना ७ ऑगस्ट रोजी असेल.
https://twitter.com/Media_SAI/status/1422704555943333890?s=20
https://twitter.com/IIS_Vijayanagar/status/1422729746975055873?s=20
नीजरबरोबर शिवपाल यादव याच्याकडूनही भालाफेक खेळात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तो दुसऱ्या गटातून भालाफेक खेळात भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
अरे व्वा! कांस्य पदक जिंकताच पीव्ही सिंधूवर पडतोय बक्षीसांचा पाऊस; आयओए देणार ‘इतके’ लाख रुपये






