हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ (आयएसएल) मध्ये यजमान एफसी गोवा संघाला शनिवारी हार पत्करावी लागली. हंगामातील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बंगळुरू एफसीला पुढील पाच सामन्यांत ( १ अनिर्णित व ४ पराभव) विजयापासून वंचित रहावे लागले होते. पण, आज त्यांनी दमदार खेळ करताना सलग चार पराभवानंतर विजयाची चव चाखली. एफसी गोवाने घरच्या मैदानावर होणारी नामुष्की टाळण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, परंतु बंगळुरू एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत संधूची बचावभींत त्यांना पार करता आली नाही. झेव्हियर हर्नांडेजने ( २७ मि. व ५७ मि. ) दोन गोल करताना बंगळुरूचा २-० असा विजय निश्चित केला. बंगळुरू एफसीचा हा हिरो आयएसएलमधील पन्नासावा विजय ठरला.
एफसी गोवा संघाचा सध्याचा फॉर्म पाहता बंगळुरूला त्यांना रोखणे अशक्य होते. पण, त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न होताना दिसले आणि २५व्या मिनिटाला क्रॉसवर हेडरद्वारे गोल करण्याची संधी बंगळुरूने थोडक्यात चुकवली. कर्णधार सुनील छेत्री याला आजही सुरुवातीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. २७व्या मिनिटाला रॉय कृष्णाच्या पासवर झेव्हियर हर्नांडेजने गोल करून बंगळुरूला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे यजमान एफसी गोवाच्या खेळाडूंचा आत्मविश्वास ढासळलेला पाहायला मिळाला.
THREE POINTS ON THE ROAD! #WeAreBFC #FCGBFC pic.twitter.com/hiiP3I1vIi
— Bengaluru FC (@bengalurufc) November 26, 2022
४५+३ मिनिटाला एफसी गोवाचा गोलरक्षक धीरजने १८ यार्ड बॉक्सबाहेर येत रॉय कृष्णाला रोखले आणि चेन्नईयनला दुसरा गोल होऊ दिला नाही. पण, रेफरीने धीरजला पिवळे कार्ड दाखवले. पहिल्या हाफच्या सुरूवातीच्या १५ मिनिटांत गोवाने वर्चस्व राखताना बंगळुरूवर दडपण निर्माण केले होते, परंतु त्यानंतर माजी विजेत्यांनी चांगले कमबॅक केले. दुसऱ्या हाफमध्ये गोवा संघामध्ये किंचीत सुधारणा दिसली आणि ५२व्या मिनिटाला अलव्हारो व्हॅझकेजने गोल करण्याचा प्रयत्न केला, पंरतु बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत संधूला तो रोखण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. गोवाकडून प्रयत्न होत होते, परंतु शेवटच्या प्रयत्न त्यांच्याकडून तितका चांगला होताना दिसला नाही.
५७व्या मिनिटाला बंगळुरूकडून काऊंटर अटॅक झाला आणि उदांता सिंगने चतुराईने चेंडू ताब्यात घेतला. पुरेसा वेळ घेत त्याने योग्यक्षणी चेंडू हर्नांडेजकडे सोपवला अन् त्याने सामन्यातील दुसरा गोल केला. पिछाडीवर पडल्यानंतर गोवाने संघात दोन बदल केले आणि ५९व्या मिनिटाला नोआ सदौईला सोपी संधी होती आणि त्याला हेडरद्वारे चेंडू गोलजाळीत पाठवायचा होता, परंतु त्याला दिशा देता आली नाही. गोवाने या लढतीतील ही आतापर्यंतची सर्वात सोपी संधी गमावली. एडू बेडियाने ६२व्या मिनिटाला ऑन टार्गेट प्रयत्न गुरप्रीतने रोखल्याने गोवाची पाटी कोरीच राहिली.
Tonight’s result at the Fatorda brings up 50 #HeroISL wins for the Blues.
On we go! ⚡️ #WeAreBFC #NothingLikeIt pic.twitter.com/bVsRgq6Gzs
— Bengaluru FC (@bengalurufc) November 26, 2022
गोवा सातत्याने आक्रमण करताना बंगळुरूवर दडपण निर्माण करत होते, परंतु पाहुण्यांचा बचाव तितकाच सुरेख होता. ७०व्या मिनिटापर्यंत एफसी गोवाने त्यांचे पाचही बदल केले होते आणि आता उर्वरित २० मिनिटांच्या खेळात सर्व मदार या खेळाडूंवरच होती. पण, त्यांच्यासमोर बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत संधू अभेद्य भिंत उभी करून उभा राहिला. ८०व्या मिनिटाला रॉय कृष्णाने आणखी एक गोल केला होता, परंतु चेंडू पोस्टच्या अगदी जवळून गेला.
गुरप्रीतचे आज सर्वाधिक कौतुक झाले पाहिले. आयएसएलमध्ये दोन पर्व गोल्डन ग्लोव्ह्ज नावावर असलेल्या गुरप्रतीने ८१व्या मिनिटाला अन्वर अलीचा बुलेटच्या वेगाने आलेला चेंडू जाळीत जाऊ दिला नाही. ९० मिनिटांच्या निर्धारीत खेळात गोवाकडून ५ ऑन टार्गेट प्रयत्न झाले आणि ते सारे गुरप्रीतने रोखले. चेंडूवरील ताबा, सर्वाधिक ५४२ पास आणि ६७८ टच होते, परंतु बंगळुरूने कमी संधी मिळूनही सोनं केलं. बंगळुरूचा बचाव आज अप्रतिम झाला आणि त्यांनी २-० असा विजय निश्चित केला. बंगळुरूचा हिरो आयएसएलमधील हा पन्नासावा विजय ठरला आणि असा पराक्रम करणारा तो चौथा ( गोवा, मुंबई सिटी व चेन्नईयन एफसी) संघ ठरला.
निकाल : बंगळुरू एफसी २ ( झेव्हियर हर्नांडेज २७ मि. व ५७ मि. ) विजयी वि. एफसी गोवा ०.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमध्ये 8 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना, ज्यामुळे हेलावले होते संपूर्ण क्रिकेटजगत
NZvIND 2nd ODI: संजू पुन्हा बाकावर! चाहत्यांनी म्हटले, ‘ 15 धावा करणारा आता आणि…’