पुणे। पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत स्वरा जावळे, अर्णव ओरुगंती, काव्या कृष्णन या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 8 वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा जावळे हिने दुसऱ्या मानांकित श्रुष्टि सूर्यवंशीचा 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
14 वर्षाखालील मुलांच्या गटात उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित अर्णव ओरुगंती याने अव्वल मानांकित आर्यन हूडचा 7-4 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. दुसऱ्या मानांकित सुधांशु सावंत याने पार्थ देवरुखकरला 7-3 असे नमविले. मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित काव्या कृष्णनने अव्वल मानांकित कौशिकी समंथावर 7-4 असा विजय मिळवला. पाचव्या मानांकित अलिना शेख हिने श्रावणी देशमुखचे आव्हान 7-4 असे संपुष्टात आणले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
8 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
श्रावी देवरे वि.वि.अवंतिका सैनी 6-3;
स्वरा जावळे वि.वि.श्रुष्टि सूर्यवंशी(2)6-2;
8 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
अंशुल पुजारी(1)वि.वि.वेदांत जोशी 6-4;
क्रिशय तावडे(2)वि.वि.अचिंत्य कुमार(8)6-5(6);
12वर्षाखालील मुले:उपांत्य फेरी:
अभिराम निलाखे(1)वि.वि.तेज ओक 7-5;
अद्विक नाटेकर(2) वि.वि.निव कोठारी 7-2;
12 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
सलोनी परिदा(1) वि.वि.वैष्णवी सिंग 7-6(1);
श्रावणी देशमुख वि.वि.अनुष्का 7-1;
14 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
अर्णव ओरुगंती(3) वि.वि.आर्यन हूड(1) 7-4;
सुधांशु सावंत(2) वि.वि.पार्थ देवरुखकर 7-3;
14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
काव्या कृष्णन(3) वि.वि.कौशिकी समंथा(1) 7-4;
अलिना शेख(5) वि.वि.श्रावणी देशमुख 7-4.