आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी अंडर-19 महिला टी20 आशिया कपची घोषणा केली आहे. आशिया कप पुढील वर्षी 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी महिला खेळाडूंची चांगली तयारी व्हावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
जय शाह (Jay Shah) यांनी अंडर-19 महिला टी20 आशिया चषकासंदर्भात एक निवेदन जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले की, “आशिया खंडातील क्रिकेटसाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. अंडर-19 महिला आशिया चषक स्पर्धेची घोषणा युवा महिला क्रिकेटपटूंना त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी आणि त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान करेल.”
पुढे बोलताना जय शाह (Jay Shah) म्हणाले, “आशिया खंडातील महिला क्रिकेटचे भवितव्य बळकट व्हावे यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आम्हाला अभिमान आहे की, या निर्णयाचा केवळ आशियातील देशांवरच नव्हे तर जागतिक क्रिकेट समुदायावरही सकारात्मक परिणाम होईल.”
🚨 BREAKING 🚨
Asian Cricket Council President Jay Shah announced the launch of the inaugural Women’s U19 T20 Asia Cup🏆🏏#JayShah #U19AsiaCup #Inaugural #Sportskeeda pic.twitter.com/TzxNSCmokT
— Sportskeeda (@Sportskeeda) September 11, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
महिला अंडर-19 आशिया कप सुरू होणार, जय शाहांची मोठी घोषणा
“आम्ही पुन्हा पाकिस्तानला हरवू” अमेरिका खेळाडूने उडवली पाकिस्तानची खिल्ली
सचिनचा ‘महान’ रेकाॅर्ड मोडणार ‘हा’ दिग्गज खेळाडू? असं आहे समीकरण