बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे वृत्त हाती येत आहे. याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी शनिवारी जय शहा यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्याची माहिती मिळते आहे. त्यांनी आशिया क्रिकेट परिषदेचे मावळते अध्यक्ष नजमुल हुसेन यांच्याकडून कार्यभार स्विकारला आहे.
बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंग धुमाळ यांनी ट्विट करत ही माहिती दिली. याशिवाय गुजरात क्रिकेट असोसिएशनने देखील ट्विट करत जय शहा यांचे अभिनंदन केले.
https://twitter.com/GCAMotera/status/1355494669837193216?s=20
https://twitter.com/ThakurArunS/status/1355481973813338112?s=20
जय शहा हे भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र असून गेले काही वर्ष ते क्रिकेट प्रशासनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१९ सालापासून ते बीसीसीआयच्या सचिव पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. तसेच सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली इस्पितळात उपचार घेत असल्याने देशांतर्गत क्रिकेटचा कार्यक्रम ठरविण्याचे काम देखील जय शहा यांच्याकडेच आहे.
महत्वाच्या बातम्या:
तो कायम माझ्या ऑल-टाईम इलेव्हनमध्ये असेल भारताच्या दिग्गज फिरकीपटूने केले पुजाराचे कौतुक
तो केक न कापण्यामागील कारण ऐकून तुम्हीही कराल अजिंक्यचे कौतुक
कार अपघातात मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डचा मृत्यू? जाणून घ्या खरं काय ते






