आयसीसी अध्यक्षपदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या पदासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचं नाव आघाडीवर आहे. या महिन्यात ते या पदासाठी उमेदवारी दाखल करू शकतात.
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, जर जय शाह यांनी या पदासाठी नामांकन दाखल केलं, तर ते आयसीसीचे नवे अध्यक्ष बनणं जवळपास निश्चित आहे. कारण जय शाह यांच्याकडे आयसीसीचा अध्यक्ष होण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची संख्या आहे. जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली तर त्यांना अनेक देशांच्या क्रिकेट बोर्डांकडून समर्थन मिळू शकतं.
जय शाह यांना आधीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर इतर अनेक क्रिकेट बोर्डही जय शाह यांची आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्याच्या बाजूनं आहेत. नियमांनुसार, आयसीसीचे अध्यक्ष बनण्यासाठी जय शाह यांना आधी त्यांचे नाव इतर कोणत्या तरी बोर्डाकडे सादर करावे लागेल, ज्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मोठे क्रिकेट बोर्ड तयार आहेत.
जय शाह यांची लोकप्रियता जवळपास सर्वच क्रिकेट बोर्डांमध्ये आहे. सध्या बीसीसीआयचे सचिव असण्यासोबतच ते आयसीसीच्या अर्थविषयक बाबींच्या उपसमितीचे प्रमुखही आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी मतदान करणाऱ्या एकूण 16 सदस्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. निवडणुका झाल्या तर जय शाह यांना निवडून येण्यासाठी 51 टक्के म्हणजेच एकूण 9 मतांची आवश्यकता असेल. अशा स्थितीत त्यांना यापेक्षा जास्त मतं मिळतील, असं मानलं जात आहे.
जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यास ते हे पद सांभाळणारे 5वे भारतीय बनतील. त्यांच्यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत.
हेही वाचा –
3 असे फलंदाज, जे दुहेरी शतकाच्या जवळ असताना कर्णधारानं डाव घोषित केला; दोन भारतीयांचाही समावेश
इंग्लंड क्रिकेटला मिळाला नवा स्टार खेळाडू! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून मोडला 94 वर्ष जुना विक्रम
ऑस्ट्रेलियाकडून खेळणार भारतीय वंशाच्या 3 क्रिकेटपटू, ‘या’ क्रिकेट मालिकेत घडणार नवीन पराक्रम