सध्या श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धा खेळली जात आहे. मात्र, स्पर्धेतील सामन्यांवर पावसाचे सावट दिसून येते. स्पर्धेतील जवळपास सामन्यात पाऊस आल्याचे दिसते. सुपर 4 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा महत्त्वाचा सामना देखील पावसामुळे धुवून गेला. हा सामना राखीव दिवशीही पूर्ण होणार का? याबाबत साशंकता आहे. हे सर्व घटक असताना आता सोशल मीडियावर लोक आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष जय शहा यांना जोरदारपणे ट्रोल करत आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार, आशिया चषक पाकिस्तानात आयोजित केला जाणार होता. मात्र, भारतीय संघाने विरोध केल्यामुळे हायब्रीड मॉडेलनुसार ही स्पर्धा पाकिस्तान व श्रीलंका येथे खेळली जातेय. श्रीलंकेतील सामने पल्लेकल व कोलंबो येथील मैदानांवर होत आहेत. मात्र, यावेळी जोरदार पाऊस होत असल्याचे दिसते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना यामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. तर, भारत विरुद्ध नेपाळ या सामन्यातही षटके कमी केली गेलेली. आता सुपर फोरमधील पुढील सामन्यांवरही पावसाचे सावट असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आशिया चषक पूर्णपणे पाण्यात जातो का अशी शंका व्यक्त होत आहे. तर सोशल मीडियावर लोक एसीसी अध्यक्ष जय शहा यांना जबाबदार धरत आहेत.
श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आशिया चषकातील सामने हंबनटोटा येथे आयोजित करण्याची विनंती केली होती. मात्र, शहा यांनी ही मागणी फेटाळून लावत कोलंबो येथेच सामन्यांचा हट्ट धरला. यापूर्वी देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेल ऐवजी युएई येथे स्पर्धा आयोजित करण्याचा मनोदय बोलून दाखवलेला. मात्र , शहा यांनी ती कल्पना फेटाळून लावलेली. त्यामुळे या मानाच्या स्पर्धेतील अनेक सामने पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे.
(Jay Shah Troll After Rain Affected Matches In Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
“तुझा शहजादा नवा बुमराह होईल”, बाबा बनलेल्या जस्सीला शाहिनच्या शुभेच्छा, पाहा अप्रतिम व्हिडिओ
पाचव्या राष्ट्रीय व्हिलचेअर रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक संघांची विजयी सलामी