आईसीसी महिला विश्वकप 2025 ची सुरुवात 30 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेपूर्वी आता आयसीसीने महत्वाची घोषणा केली आहे. पहिल्यांदाच आयसीसीच्या स्पर्धेत सर्व महिला अंपायर आणि मॅच ऑफिशियल्स असणार आहेत. एकूण 14 महिला अंपायरची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी निवेदन जाहीर करताना सांगितले की हा निर्णय क्रिकेट जगाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
महिला विश्वकपासाठी सर्व महिला अधिकाऱ्यांच्या पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये मॅच रेफरी आणि अंपायर यांचा समावेश आहे. खाली संपूर्ण यादी दिली आहे.
मॅच रेफरी: ट्रुडी अँडरसन, शांद्रे फ्रिट्झ, जी.एस. लक्ष्मी, मिशेल पेरेइरा.
अंपायर: लॉरेन अजनबैग, कॅंडेस ला बोर्डे, किम कॉटन, साराह डंबनेवाना, शाथीरा जाकीर जेसी, कैरिन क्लास्टे, जनानी एन, निमाली पेरेरा, क्लैरी पोलोसाक, वृंदा राठी, सुई रेडफर्न, एलोइसे शेरिडन, गायत्री वेणुगोपालन, जॅकलीन विल्यम्स.
महिला वर्ल्डकपसाठी महिला पॅनेलच्या घोषणेवर आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, “हा महिला क्रिकेटच्या प्रवासातील एक मोठा क्षण आहे आणि यामुळे सर्व प्रकारच्या खेळांमध्ये अनेक सुंदर कथा घडतील. मॅच ऑफिशियल्ससाठी केवळ महिलांचा पॅनेल तयार करणे हा फक्त एक मोठा टप्पा नाही, तर आयसीसीची जेंडर इक्वॅलिटी जपण्याची बांधिलकीही दर्शवतो. महिलांच्या खेळात नवा अध्याय लिहिण्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की हा निर्णय स्पर्धेबाहेरही महिलांना ऑफिशियल्सशी संबंधित करिअर स्वीकारण्यासाठी प्रेरणा देईल.”






