सध्या भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे (India Tour Of South Africa). पुढे संघांमध्ये सध्या कसोटी मालिकेतील तिसरा व अखेरचा कसोटी सामना खेळला जातोय. या कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ वनडे मालिकेत एकमेकांसमोर येतील (SAvIND ODI Series). या वनडे मालिकेसाठी उर्वरित भारतीय खेळाडू १२ जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. तत्पूर्वी, संघाचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हा कोरोना पॉझिटिव्ह (Washington Sundar Corona) आला आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेत उपलब्ध असलेल्या कसोटी संघातील अष्टपैलूला दक्षिण आफ्रिकेत थांबण्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
या खेळाडूला दक्षिण आफ्रिकेत थांबण्याची निर्देश
वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तो दक्षिण आफ्रिकेला जाणार नसल्याचे निश्चित झाले आहे. त्याच्या जागी कसोटी संघाचा भाग असलेला फिरकी अष्टपैलू जयंत यादव (Jayant Yadav) याला दक्षिण आफ्रिकेत थांबण्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. असे झाल्यास जयंत तब्बल सहा वर्षांनंतर वनडे क्रिकेट पुनरागमन करेल. त्याने आपला अखेरचा सामना एमएस धोनीच्या नेतृत्वात २०१६ मध्ये खेळला होता.
वॉशिंग्टन सुंदर कोरोना पॉझिटिव्ह
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याच्या एक दिवस आधी सुंदर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण, वनडे संघाचे प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे देखील या मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. मागील १० महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर असलेल्या सुंदरला या मालिकेतून पुनरागमनाची आस होती. मात्र, आता त्याचे पुनरागमन आणखी लांबणार असल्याचे निश्चित झाले आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, युझवेंद्र चहल, आर अश्विन, जयंत यादव , जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडूलकरची बीसीसीआयमध्ये होणार एन्ट्री? वाचा काय म्हणाले जय शाह (mahasports.in)
भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय सामना पाहिलाय का? बघा हा व्हिडिओ (mahasports.in)