१३ मार्चला सौराष्ट्र संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवण्यात यश मिळवले. हे विजेतेपद मिळवण्यात सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने मोठा वाटा उचलला आहे. त्याने १३.२३ च्या सरासरीने या रणजी मोसमात सर्वाधिक ६७ विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका वेगवान गोलंदाजाने एका मोसमात घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत.
रणजी ट्रॉफीतील विजयानंतर जयदेव उनाडकटने त्याचा साखरपूडा झाला असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले आहे. त्याने रणजी ट्रॉफी जिंकल्यानंतर दोन दिवसांनी रन्नी नावाच्या मुलीबरोबर साखरपूडा केला आहे. तसेच त्याने त्याच्या साखरपूड्याचा फोटो पोस्ट करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
त्याच्या साखरपूड्याला त्याचा सौराष्ट्र संघातील संघसहाकारी चेतेश्वर पुजारा देखील पत्नी पुजासह उपस्थित होता. पुजारानेही सोशल मीडियावर उनाडकटच्या साखरपूड्यादरम्यानचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये उनाडकट, त्याची होणारी पत्नी रिन्नी, पुजारा आणि त्याची पत्नी पुजा आहेत.
हा फोटो पुजाराने पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की ‘रिन्नी तूझे कुटुंबात स्वागत आहे. मला आनंद आहे की माझा भाऊ जयदेवला त्याच्या आयुष्यातील प्रेम मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे आता तूला आमचा ब्रोमान्स झेलावा लागेल.’
सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी जिंकली त्यावेळी बंगाल विरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी पुजारा देखील सौराष्ट्र संघाचा भाग होता. पुजाराने अंतिम सामन्यात पहिल्या डावात महत्त्वपूर्ण ६६ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
– अखेर कॅप्टन कूल एमएस धोनीने चेन्नई सोडलीच
– यावेळी आयपीएलचे असे काही आयोजन होणार की प्रेक्षकही होतील…
– आयपीएलच्या पावरप्लेमध्ये वॉर्नर, गेल नाही तर भारताचा हा…