---Advertisement---

बांगलादेशविरुद्ध जयदेव उनाडकटची धमाकेदार सुरूवात, यजमानांचे दोन्ही सलामीवीर परतले तंबूत

Team India Jaydev Unadkat vs BAN
---Advertisement---

भारताचा पुरूष क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात आधी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. ही मालिका यजमानांनी 2-1 अशी जिंकली. आता या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून भारताने पहिला सामना 188 धावांंनी जिंकत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यातील दुसऱ्या सामन्याला गुरूवारी (22 डिसेंबर) सुरूवात झाली. ज्यामध्ये भारताच्या कसोटी संघात 12 वर्षानंतर परतणाऱ्या जयदेव उनाडकटने पहिली विकेट घेतली.

मध्यमगती वेगवान गोलंदाज असलेला जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याच्या या विकेटचे कौतुक म्हणजे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही पहिलीच विकेट ठरली आहे. त्याने बांगलादेशच्या झाकिर हसन याला कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याच्याकरवी झेलबाद केले. हसन 34 चेंडूत 15 धावा करत तंबूत परतला. त्याने मागील सामन्यात शतकी खेळी केली होती. यामुळे त्याची विकेट भारतासाठी महत्वाची ठरली आहे. (Jaydev Unadkat First Test Wicket)

उनाडकटने 16 डिसेंबर 2010मध्ये भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले होते. त्यावेळी तो सेंचुरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यानंतर त्याने देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी सुरूच ठेवली, मात्र त्याला भारतीय संघात परतता आले नाही.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांनी फलंदाजीला उत्तम सुरूवात केली. यामुळे ते मोठी धावसंख्या उभारतील का अशी चिंता असताना उनाडकटने त्याला ब्रेक दिला. त्याच्यानंतर आर अश्विन यानेही यजमानांना दुसरा धक्का दिला. त्याने नजमुल शंटो याला 24 धावांवर पायचीत केले. अशाप्रकारे बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले.

 

पहिल्या सत्रात बांगलादेशची स्थिती 2 बाद 82 धावा अशी झाली आहे. मोमिनुल हक 23 आणि कर्णधार शाकिब अल हसन 16 धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. Jaydev Unadkat good start against Bangladesh in second Test BANvIND

हा सामना भारताला जिंकणे महत्वाचे आहे, कारण भारताचा आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग सोपा होईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: सहा वर्षांपूर्वी कर्णधार रोहित शर्माने आणले होते वादळ! टी20 मध्ये झळकावले होते वेगवान शतक
BANvIND: ‘मॅचविनर’ कुलदीपला बाहेर केल्याने भडकले चाहते, कर्णधार राहुलची लावली क्लास

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---