भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. वनडे मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर उभय संघांमध्ये 14 डिसेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघात दुखापतींचे प्रमाण वाढले आहे. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा अद्यापही दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाही. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यावर अनुभवी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत याला संधी दिली गेली असल्याचे सांगितले जात आहे. तब्बल 12 वर्षानंतर तो भारताच्या कसोटी संघात दिसेल.
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला मोहम्मद शमी टी20 विश्वचषकानंतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर आराम देण्यात आलेला. तर, बांगलादेश दौऱ्यासाठी त्याची निवड केली गेलेली. मात्र, संघ बांगलादेशला रवाना होण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला व वनडे मालिकेतून बाहेर पडला. आता तो कसोटी मालिकेतूनही बाहेर पडण्याची चिन्हे आहेत.
त्याच्या जागी कसोटी संघात मुकेश कुमार किंवा उमरान मलिक यांचा समावेश केला जाऊ शकतो अशी बातमी समोर आलेली. मात्र, त्यात कोणतेही तथ्य एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार, शमी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याच्या जागी जयदेव उनाडकत याला बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे.
उनाडकत 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपला पहिला व अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तसेच त्याने भारतीय संघासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना चार वर्षांपूर्वी खेळला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरेशी संधी मिळाली नसली तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी जबरदस्त राहिली आहे. त्याने आत्तापर्यंत 96 प्रथमश्रेणी सामने खेळताना 353 बळी मिळवले आहेत. तर, 2019 मध्ये रणजी ट्रॉफी जिंकलेल्या तसेच नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी विजेत्या सौराष्ट्र संघाचा तो कर्णधार राहिला आहे.
(Jaydev Unadkat has been called up as Mohammed Shami’s replacement for India’s Test series against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला नडणाऱ्या पठ्ठ्याने सोडली इंग्लंडची साथ; ‘या’ देशासाठी खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट
BANvIND: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय; भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल