---Advertisement---

वैतागलेल्या गोलंदाजाने विकेट मिळाली नाही म्हणून थेट तोडला स्टंप

On: गुरूवार, मार्च 12, 2020 8:10 PM
---Advertisement---

राजकोट येथे सौराष्ट्र विरुद्ध बंगाल संघात रणजी ट्रॉफीतील अंतिम सामना सुरु आहे. आज (12 मार्च) या सामन्याच्या चौथ्या दिवशी सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनादकटने चेंडू स्टंपवर मारत विकेट न घेता येण्याची निराशा व्यक्त केली आहे.

काल (11 मार्च) सौराष्ट्र संघाचा पहिला डाव सर्वबाद 425 धावांवर संपला आणि त्यांनी बंगालला 426 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगालचा फलंदाज सुदीप चॅटर्जीने उनादकटचा 93व्या षटकाचा तिसरा चेंडू अडवला. त्यामुळे चॅटर्जीला खेळपट्टीच्या आत राहण्याची चेतावणी देण्यासाठी उनादकटने चेंडू स्टंपवरती मारला. यामुळे मधला स्टंप तुटून बाजूला पडला.

https://twitter.com/SoumyaSarkarFan/status/1237996793670950912?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1237996793670950912&ref_url=https%3A%2F%2Fcircleofcricket.com%2Fcategory%2FDomestic_Cricket%2F49740%2Franji-trophy-2020-watch-frustated-jaydev-unadkat-breaks-stump-with-a-throw-during-ranji-final

सामन्यादरम्यान चॅटर्जी आणि बंगालचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने मिळून 101 धावांची भागिदारी केली. यानंतर चॅटर्जी 101.2 षटकात 81 धावांवर झेलबाद झाला. तर साहा 110.4 षटकात 64 धावांवर त्रिफळाचीत झाला.

उनादकटने या रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तरी त्याला अंतिम सामन्यात एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. याच कारणामुळे त्याने चॅटर्जीवर अशा प्रकारे आपली निराशा व्यक्त केली आहे.

सौराष्ट्रने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगालने 147 षटकात 7 बाद 354 धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

परदेशातील दिग्गज खेळाडू नसणार २०२० आयपीएलचा भाग?

शेतकरी मित्र: क्रिकेटर अजिंक्य रहाणे आता थेट शेतकऱ्यांच्या मदतीला

या तिकडीच्या मदतीने दक्षिण आफ्रिका भारताला देणार तगडे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---