मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२ मध्ये प्रदर्शन अद्याप खूपच निराशाजनक राहिले आहे. मुंबईने चालू हंगामातील त्यांच्या सुरुवातीच्या सहा सामन्यांपैकी सर्वच्या सर्व सामने गमावले आहेत. अशात मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेले ८ सामने जिंकणे गरजेचे आहे. मात्र, त्यांचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचे म्हणणे आहे की, प्लेऑफमध्ये स्थान बनवण्याचा जास्त विचार करण्याची गरज नाहीये.
मुंबई इंडियन्सचा मध्यमगती वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) याच्या मते संघाने सध्या केवळ एकजुटीने काम करण्याची गरज आहे. मुंबईलाच्या संघात गोलंदाजांची कमतरता भासत असून याच कारणास्तव संघ अजून एकही सामना जिंकू शकला नाहीये. सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत उनाडकट म्हणाला की, “सामूहिक प्रयत्नांची गरज आहे आणि आम्हाला त्यावर जोर द्यावा लागेल. आम्ही आमच्या चुकांमधून शिकून चांगले प्रदर्शन करू.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“आमच्या काही गोलंदाजांनी काही चांगली षटके टाकली आहेत, पण एका गोलंदाजी आक्रमणाच्या रूपात आम्हाला एकत्रपणे चांगले प्रदर्शन करता आले नाहीये. एका संघाच्या रूपात चांगले प्रदर्शन कसे करता येईल, यावर आम्ही चर्चा केली आहे. शेवटची षटके किंवा पावरप्लेमध्ये कोणतीही नवीन गोष्ट झाली नाहीय, चर्चा फक्त एका संघाच्या रूपात चांगले प्रदर्शन करण्याविषयी केली गेली आहे,” असे उनाडकट पुढे बोलताना म्हणाला.
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही संघाला लीग स्टेजमध्ये ८ सामने जिंकणे गरजेचे असते. अशात मुंबईला जर प्लेऑफमध्ये स्थान बनवायचे असेल, तर त्यांना पुढचा एकही सामना गमावून चालणार नाही, पण उनादकटच्या मते त्यांनी एवढ्या पुढचा विचार केलेला नाहीये. संघाला सुरुवातीला एकजुटीने खेळण्याची गरज आहे. “एवढ्या पुढचा विचार केला नाहीये. आम्हाला प्रत्येक सामन्यानंतर लक्ष केंद्रित करून प्रदर्शनात सुधारणा करावी लागेल. एकदा असे झाले, तर सर्वकाही ठीक होईल. सध्या एक विजय आणि दोन गुणांसह खाते खोलणे गरजेचे आहे,” असे उनाडकट म्हणाला.
दरम्यान, पहिल्या सहा सामन्यात पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पराभूत करून हंगामातील पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. सीएसकेविरुद्धचा हा सामना गुरुवारी (२१ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी बूम बूम बुमराहने गाळला घाम; ट्रेनिंगदरम्यानचा खास व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग! आयपीएल सुरू असतानाच कायरन पोलार्डचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम
मुंबईचा सूर्य बुडताना पाहून रोहितला आठवला ‘हा’ वेगवान गोलंदाज; केली संघात सामील करण्याची मागणी?