मुंबई इंडियन्स संघाकडे इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून पाहिले जाते. कारण, त्यांनी आतापर्यंत एकदा- दोनदा नाही, तर तब्बल पाच वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. मात्र, आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई संघ सपशेल फ्लॉप ठरताना दिसतोय. त्यांनी या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यात सपाटून पराभव पत्करला आहे. आता मुंबई संघाला गुरुवारी (दि. २१ एप्रिल) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअममध्ये आयपीएलचा ३३वा सामना खेळायचाय. मुंबईसारखीच गत चेन्नईचीही आहे. फक्त त्यांनी ६पैकी एक सामना जिंकला आहे. अशातच असे वृत्त समोर येतंय की, मुंबई संघात अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीला लवकरच सामील केले जाऊ शकते.
सध्याच्या हंगामात मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) गोलंदाज विकेट्ससाठी तरसताना दिसतायेत. धवल कुलकर्णीला (Dhawal Kulkarni) आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने घेतले नव्हते. तो सध्या स्टार स्पोर्ट्सच्या समालोचन टीमचा भाग आहे. मुंबई संघाने सुरुवातीचे तीनही सामने गमावले असून ते पहिल्या विजयाची वाट पाहतायेत. सध्या मुंबई १० संघांच्या गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानी आहे. अशात आणखी एक पराभव त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर करू शकतो.
माध्यमांतील वृत्तांनुसार सूत्रांनी असे सांगितले की, “मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या वेगवान गोलंदाजांच्या फळीला आणखी मजबूत करण्यासाठी धवल कुलकर्णीला संघात सामील करण्याची मागणी केलीये. धवल मुंबईचाच आहे. अशात त्याला मुंबई आणि पुण्याच्या मैदानांवर कशाप्रकारे गोलंदाजी करतात, हे चांगल्याप्रकारे माहितीये.”
मुंबईच्या गोलंदाजांनी केले निराश
मुंबईच्या वाईट प्रदर्शनामागे त्यांच्या गोलंदाजांचे योगदान राहिले आहे, जे विकेट घेण्यात अयशस्वी ठरतायत. याव्यतिरिक्त गोलंदाजांनी अधिक धावाही दिल्या आहेत. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने काही सामन्यात चांगली गोलंदाजी केलीये. मात्र, त्याला इतर गोलंदाजांची साथ मिळाली नाही. त्यामुळे संघाची ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई संघ ३३ वर्षीय धवल कुलकर्णीला आपल्या सोबत जोडण्याकडे पाहत आहे. धवलकडे आयपीएलचा चांगला अनुभव आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
धवल कुलकर्णीची आयपीएल कारकीर्द
धवल कुलकर्णीच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये एकूण ९२ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ८.३१च्या इकॉनॉमी रेटने ८६ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला आहे. आयपीएल २०२०मध्ये मुंबईने धवलला ७५ लाख रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले होते. दुसरीकडे १४व्या हंगामातही तो मुंबईचाच भाग होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रिषभ पंतने फॉर्ममध्ये येणे खूप गरजेचे, नाहीतर…’, भारताच्या माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
आयपीएल २०२२च्या खाणीतून टीम इंडियाला मिळाले ‘हे’ ३ हिरे; आगामी टी-२० विश्वचषकात मिळवू शकतात स्थान