अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्तिथीमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) 20 सदस्यीय संघही जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. याबरोबरच भारतीय संघात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आयपीएलमधील चांगल्या प्रदर्शनानंतर भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. परंतु अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकट पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला आहे.
जयदेव उनाडकटला नाही मिळाली संधी
भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात श्रीलंकाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी घोषित केलेल्या संघात अनेक नवीन खेळाडूंचा समावेश आहे, जे पहिल्यांदा निळ्या जर्सीमध्ये दिसतील. त्याचबरोबर असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांना या दौर्यावर स्थान मिळालेले नाही. जयदेव उनाडकट देखील अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांना संघात स्थान मिळालेले नाही.
मागील रणजी मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा उनाडकट श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडला जाईल अशी अपेक्षा होती. पण गुरुवारी संघ जाहीर झाल्यानंतर त्याने आपल्या आशा गमावल्या. यानंतर उनाडकटने आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. जिथे त्याने लिहिले आहे की, तो आपल्या खेळावर कठोर परिश्रम करत राहील आणि आपल्याला का निवडले नाही किंवा संधी कधी येईल? याचा विचार करण्यात वेळ घालवणार नाही. त्याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली असून सोशल मीडियापासून अंतर ठेवण्याविषयीही बोलला आहे.
वेगवान गोलंदाजाने आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला क्रिकेटबद्दलची माझी आवड दिसली आणि सर्व महान खेळाडू मैदानावर मनापासून खेळताना पाहण्याची प्रेरणा मिळाली. मी लहान होतो तेव्हा काही लोकांनी मला लहान गावातून स्वप्न पाहणारे म्हणून लेबल लावले. पण हळूहळू त्यांचा समज बदलला. या खेळाने मला बरेच काही दिले आहे. परंतु आता माझी माझी निवड का झाली किंवा माझा वेळ कधी येईल आणि मी काय चूक केली? याचा मला काही काळ पश्चाताप होणार नाही.”
उनाडकटने त्याच्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले आणि सोशल मीडियावरुन ब्रेक घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली.
💪🏼🔥 pic.twitter.com/4Yo4r0VKeK
— Jaydev Unadkat (@JUnadkat) June 12, 2021
जयदेव उनाडकटने पुढे लिहिलं आहे की, “तुमच्या शुभेच्छा आणि समर्थनाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि अजून प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. तोपर्यंत सोशल मीडिया डिटॉक्स मोड चालू आहे!”
2019 – 2020 रणजी करंडक हंगामात उनाडकट सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होता. त्याने सौराष्ट्र संघाच्या ट्रॉफी जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तरीही त्याला मागील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी दिली गेली नाही. त्यानंतर नुकत्याच इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या संघातही त्याला स्थान मिळाले नाही. एवढेच नव्हे तर, श्रीलंका दौऱ्यावरील निवडीचा प्रबळ दावेदार असूनही त्याच्यावर दुर्लक्ष केले गेले.
महत्वाच्या बातम्या
‘जेंटलमेन गेम’ची नाचक्की! शाबिकपुर्वी ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचाही लाईव्ह सामन्यात सुटलाय संयम
वय केवळ आकडा! ३९ वर्षीय माही पळतोय घोड्याच्या बरोबरीने, पत्नीनेही केलं तोंडभरुन कौतुक
व्वा रे ‘किंग कोहली’! WTC फायनलपुर्वी गोलंदाजीत आजमावला हात, अनुभवी फलंदाजालाही टाकले संकटात