बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) मार्चमध्ये एशिया आणि वर्ल्ड इलेव्हन यां संघामध्ये होणाऱ्या दोन सामन्याचे आयोजन करणार आहे. या सामन्याचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त केले जात आहे. आयसीसीने त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला आहे.
एशिया संघात पाच भारतीय खेळाडू असतील. परंतु, बीसीसीआयने असे स्पष्ट केले आहे की एशिया इलेव्हन संघात कोणताही पाकिस्तानी खेळाडू असू नये. हे सामने 18 आणि 21 मार्च 2020 रोजी मीरपूर येथे खेळले जातील.
बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज म्हणाले की, “कोलकाता येथे दिवस-रात्र कसोटी दरम्यान या संदर्भात काही चर्चा झाल्या. त्यात एशिया इलेव्हन संघात भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळण्याची शक्यता कमी आहे. सौरववर अवलंबून आहे, तो बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी चर्चा करणार आहे.’
श्रीलंकेच्या नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चेअरमन एहसान मणी यांनी पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित देश असल्याचे म्हटले होते.
त्याला उत्तर म्हणून बीसीसीआयचे उपाध्यक्ष माहीम वर्मा म्हणाले, पाकिस्ताने पहिले आपले दोष बघा. आमच्या देशाचे रक्षण कसे करावे आणि आमचे प्रश्न कसे सोडवायचे हे आम्हाला माहित आहे.






