इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी चांगलीच संघर्षपूर्ण झाली. ऍशेस 2023 मधील हा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी जिंकत मालिकेत 2-0 अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे धावबाद झाला त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. आता त्यावर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अखेरच्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या समाप्तीच्या काही आधीचे षटक टाकताना कॅमेरून ग्रीन याने अखेरचा चेंडू बाऊन्सर टाकला. फलंदाजी करत असलेल्या जॉनी बेअरस्टो याने तो चेंडू सोडला आणि पुढे चालू लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ऍलेक्स केरी याने चेंडू हातात आल्यानंतर थेट यष्ट्यांवर फेकला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. मैदानावरील पंचांना नक्की काय घडले हे न समजल्याने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितल्यावर त्याला बाद दिले गेले. मात्र, षटक संपले असाच समज करून बेअरस्टो बाहेर उभा राहिला होता.
या प्रकरणावर दोन दिवसांपासून बरीच चर्चा होतेय. यावर आता इंग्लंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी थेट ऑस्ट्रेलियन संघाला नैतिकतेचे धडे दिले आहेत. त्यांनी म्हटले,
“मी आपल्या संघाला नेहमीच कडवा प्रतिस्पर्धी आणि निष्पक्ष संघ म्हणून पाहिले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन संघात माणुसकी शिल्लक असेल तर ते या प्रकरणावर सार्वजनिक माफी मागतील.”
आपल्या कारकिर्दीतील काही घटनांचा उल्लेख करताना त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाने कशाप्रकारे खिलाडीवृत्ती दाखवून, अशा प्रकारचे वाद टाळले होते हे देखील सांगितले. सध्या क्रिकेट वर्तुळात हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेकांनी ऑस्ट्रेलियन संघाने खिलाडूवृत्ती दाखवायला हवी होती असे म्हटले. तर, काहींनी बेअरस्टो हा बेजबाबदारपणे वागला असे देखील म्हटले.
(Jeffrey Boycott Said Australia Should Say Public Apology For Bairstow Runout Decison)
महत्वाच्या बातम्या –
‘ते दोघे वर्ल्ड कपमध्ये भारताचे हुकमी एक्के’, दिग्गजाने यांच्यावर खेळला दाव
अफगाणिस्तानच्या प्रमुख खेळाडूचा क्रिकेटमधून तडकाफडकी ब्रेक! वर्ल्डकपआधी संघाला मोठा धक्का