मुंबई येथे सुरू असलेल्या पहिल्या वुमेन्स प्रिमियर लीगमधील (WPL) दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा 60 धावांनी मोठा पराभव करत विजयी सुरुवात केली. दिल्लीसाठी खेळणारी भारतीय संघाची प्रमुख फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज ही या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डान्स करताना दिसली.
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने आरसीबीवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. दिल्लीने खेळाच्या तीनही विभागात शानदार कामगिरी करताना विजय संपादन केला. त्याचवेळी दिल्लीसाठी क्षेत्ररक्षण करत असताना जेमिमा रॉड्रिग्ज ही थेट डान्स करताना दिसत होती. आरसीबीची फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानावर रंग दे बसंती हे गीत वाजवले जात होते. त्यावेळी जेमिमा भांगडा करताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
.@JemiRodrigues got moves 🕺pic.twitter.com/vAFbmNKWwq
— CricTracker (@Cricketracker) March 5, 2023
दिल्लीसाठी सर्वात महागडी भारतीय खेळाडू म्हणून जेमिमा खेळत आहे. तिच्यावर दिल्लीने 2 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावली होती. तसेच तिच्याकडे संघाचे उपकर्णधारपद देखील देण्यात आले आहे. तिने या सामन्यात आपल्या संघासाठी उपयुक्त योगदान दिले. तिने 15 चेंडूवर नाबाद 22 धावा काढल्या.
या सामन्याचा विचार केल्यास दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 223 धावा काढल्या. कर्णधार मेग लॅनिंग व शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 162 धावांची भागीदारी केली. दोघींनी अनुक्रमे 72 व 84 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना आरसीबी सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसली. स्मृती मंधाना, हिदर नाईट व मेगन शूट यांनी उपयुक्त योगदान दिले. मात्र, संघाला 60 धावांनी पराभूत व्हावे लागले. दिल्लीसाठी तारा नॉरिसने सर्वाधिक पाच बळी मिळवले.
(Jemimah Rodrigues Bhangda Dance In WPL Match Against RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप
चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश