Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जन्माने आयरिश असलेला पठ्ठ्या फक्त आईमुळे इंग्लंडकडून खेळू शकला, देशाच्याच भल्यासाठी सोडलं क्रिकेट

जन्माने आयरिश असलेला पठ्ठ्या फक्त आईमुळे इंग्लंडकडून खेळू शकला, देशाच्याच भल्यासाठी सोडलं क्रिकेट

March 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Eoin-Morgan-And-Alastair-Cook

Photo Courtesy: Twitter/ICC


दिवस होता 14 जूलै 2019. क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्डसवर वनडे वर्ल्डकपची फायनल खेळली जात होती. समोरासमोर होते यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड. क्षणाक्षणाला मॅच बदलत होती. वादग्रस्तरीत्या शेवटी मॅच टाय झाली. विजेत्याचा निकाल लावणे गरजेचे होते म्हणून सुपर ओव्हर खेळली गेली. त्यातही शेवटच्या बॉलवर न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 2 रन्सची गरज होती. जोफ्रा आर्चरचा बॉल मार्टिन गप्टिलने मिड विकेटच्या दिशेने मारला आणि तो दुसऱ्या रनासाठी धावू लागला. मात्र, जेसन रॉयचा थ्रो जोस बटलरने स्टम्सच्या आधीच कलेक्ट केला आणि गप्टिल रन आऊट झाला. क्रिकेट इतिहासातील सर्वात थरारक मॅच संपली आणि जगाला नवा विश्वविजेता मिळाला इंग्लंड. 44 वर्षांपासून ज्या ट्रॉफीची वाट टीम आणि सारा देश पाहत होता, ती ट्रॉफी इंग्लंडमध्ये आली होती. आणि हे स्वप्न पूर्ण करणारा देवदूत कॅप्टन होता ऑयन मॉर्गन. देवदूत यासाठी की, खास वर्ल्डकप जिंकवण्यासाठी त्याला कॅप्टन म्हणून पाठवले गेले असेल.

ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) जन्माने आयरिश. इंग्लंडचे शेजारी असलेल्या आयर्लंडच्या डब्लिन येथील त्याचा जन्म. तिथली क्रिकेट संस्कृती ही चांगली. आपोआप ऑएनची पावले क्रिकेटच्या मैदानाकडे वळू लागली. त्याचे वडीलही क्रिकेट खेळायचे. ऑएन तिथे अनेकांना स्पेशल वाटायचा. हा एक दिवस चांगल नाव कमावेल अशी सर्वांना अपेक्षा होती. अंडर 13, अंडर 15 आणि अंडर 17 अशा ग्रूपमध्ये त्याने आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले. त्याच दरम्यान त्याला काउंटी क्लब मिडलसेक्सकडून ऑफर आली. त्यांच्या युथ सेटअपमध्ये तो खेळायचा. 2004 अंडर नाईन्टीन वर्ल्डकपसाठी आयर्लंडने क्वालिफाय केलं आणि मॉर्गनला संधी भेटली. तो सर्वाधिक रन्स करणारा आयरिश बॅटर बनला. त्याचं नाव फक्त आयर्लंडच नव्हेतर इंग्लंडमध्ये गाजत होतं.

लवकरच तो आयर्लंडच्या सीनियर संघात आला. इंटरनॅशनल क्रिकेटर‌ बनला. 2007 ला इतिहास घडला आणि आयर्लंड आपला पहिला वर्ल्डकप खेळला. पाकिस्तानला मात देणाऱ्या त्या आयरिश टीममध्ये मॉर्गनचाही समावेश होता. ऑयन मॉर्गन नाव चर्चिलं जात होत. त्याची आई इंग्लिश असल्याने तो इंग्लंडकरता खेळण्यासाठी पात्र होता. 2007 मध्ये त्याला इंग्लंडच्या टीममध्ये घेण्यात आली आहे. मात्र, डेब्यू करण्यासाठी त्याला 2009 ची वाट पाहावी लागली. मॉर्गन कबूल करतो की, “मला तेराव्या वर्षापासूनच वाटायचं की मी इंग्लंडसाठी खेळाव. त्याचं साधं कारण होते ते म्हणजे मला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा होती.” त्यावेळी आयर्लंड आयसीसी फुल मेंबर नसल्याने टेस्ट खेळत नसत.

इंग्लंडसाठी पहिली मॅच खेळल्यानंतर तो तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी खेळून गेला. 2010 मध्ये इंग्लंडने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप जिंकला. त्यात मॉर्गनचाही सिंहाचा वाटा होता. संघाचा नियमित सदस्य बनला. ज्या टेस्ट क्रिकेटसाठी त्याने देश सोडलं ते मात्र त्याला जास्त खेळत आले नाही. त्याच्या नशिबी फक्त 16 टेस्ट आल्या. पण म्हणतात ना आपल्या नशिबात एक गोष्ट नसली की, दुसरी गोष्ट नक्की लिहिलेली असते. अगदी तसंच त्याच्यासोबत झालं.

इंग्लंड टीमच्या खराब कामगिरीनंतर 2014 च्या शेवटी ऍलिस्टर कूक (Alastair Cook) याची वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हकालपट्टी केली गेली. त्याचा उत्तराधिकारी बनला मॉर्गन. अवघ्या दोन महिन्यात त्याच्यापुढे आव्हान होतं वर्ल्डकपच. मात्र, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेला हा वर्ल्डकप साऱ्या इंग्लंडसाठी विसरण्यासारखा राहिला. ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेशने हरवल्याने ते क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होऊ शकले नाहीत. हा इंग्लंड क्रिकेटसाठी एक मोठा धक्का होता.

बोर्डाने मॉर्गनवरील विश्वास कायम ठेवला आणि त्याला लिमिटेड ओव्हरची टीम बांधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्याने कोणतीही भीडभाड न ठेवता मोठमोठे निर्णय घेतले. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि इयान बेल या दिग्गजांना त्याने टीममधून बाहेरचा रस्ता दाखवला. एक मजबूत इंग्लिश टीम उभी केली. अवघ्या एका वर्षात नवी इंग्लंड टीम 2016 टी20 वर्ल्डकपची फायनल खेळत होती. तिथे त्यांचा विजय जवळपास नक्की झालेला. मात्र, ब्रेथवेटच्या चार सिक्सने तख्तापलट केला. इंग्लंडच दुसऱ्यांदा टी20 चॅम्पियन होण्याचे स्वप्न अपुरं राहिलं. पण, त्याने बनवलेली टीम क्रिकेटविश्वात धुमाकूळ घालत होती. वनडे क्रिकेट खेळायची तर त्यांनी रीतच बदलली. फक्त अटॅक आणि अटॅक हेच एक सूत्र अवलंबले. अनेक वर्ल्डरेकॉर्ड नावे केले.

आणि मग आला तो क्षण. गेल्या चार वर्षापासून केलेली मेहनत फळाला आली. जबरदस्त खेळ आणि इच्छाशक्ती दाखवत इंग्लंड लॉर्ड्सवर वर्ल्ड चॅम्पियन झाले. आयर्लंडवरून आलेल्या एका तरुणानं क्रिकेटचे जनक म्हटल्या जाणाऱ्या इंग्लंडला तो दिवस दाखवलेला.
त्याचं पुढचं टार्गेट टी२० वर्ल्डकप होत. कोरोनाने 2020 हे वर्ष जवळपास वाया गेलं. 2021 मध्ये यूएईत टी20 वर्ल्डकप होणार होता. पण, त्याआधी आयपीएलमध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे यशस्वी नेतृत्व करत संघाला फायनलपर्यंत नेले. पुढच्या एका महिन्यात इंग्लंड पुन्हा वर्ल्डकपची सेमीफायनल खेळली.

कॅप्टन्सीत मास्टरमाइंड असलेला मॉर्गन बॅटिंग फॉर्मसाठी चाचपडत होता. दुबळ्या नेदरलँडविरुद्धही त्याला यश मिळालं नाही. उगीच संघातील जागा अडवण्यात काही अर्थ नाही, असा विचार करून सरळ रिटायरमेंट घोषित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेही वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी. अगदी निस्वार्थीपणे इंग्लिश क्रिकेटची सेवा केल्यानंतर, इंग्लिश क्रिकेटच्याच भल्यासाठी थांबण्याचा निर्णय त्याने घेतला. आता कदाचित तो फक्त टी20 लीग खेळताना दिसेल. पण, इथून पुढे कायम तो इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ कॅप्टन म्हणूनच ओळखला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय बॉलिंगचा मूळपुरुष निसार! स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात जाऊन हलाखीत जगला
‘या’ मराठमोळ्या व्यक्तीने भारतासाठी खेळलाय पहिला बॉल, 90टक्के लोकांना माहितीच नाही; तुम्ही घ्या जाणून


Next Post
Photo Courtesy: Twitter

जेमिमाचा चालू सामन्यात भन्नाट भांगडा! व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

South-Africa

'त्या' वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिकेवर लागला चोकर्सचा शिक्का, खेळाडू स्वप्नातही विसरणार नाहीत

Indian-Captains

क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील दुर्मिळ योगायोग, भारतीयांनाही लावलाय नंबर; एका क्लिकवर घ्या जाणून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143