वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. या लिलावात भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिने अनेक संघांचे लक्ष वेधून घेतले. दिल्ली व गुजरात या संघांमध्ये झालेल्या काट्याच्या लढतीमध्ये तिने 2 कोटी 20 लाखांची बोली मिळवत दिल्ली संघात आपले स्थान बनवले. एक दिवस आधी पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात केलेल्या खेळीचा तिला फायदा झाल्याचे म्हटले जात आहे.
.@JemiRodrigues joins @DelhiCapitals 👍 👍
Base Price: INR 50 Lakh
Goes for: INR 2.20 Crore#WPLAuction pic.twitter.com/Q1GReIjPei
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
जेमिमा ही भारतीय संघाची तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारी फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणारी जेमिमा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ओळखली जाते. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारताने आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळला. भारतीय संघ या सामन्यात अडचणीत असताना तिने जबाबदारीने खेळ 53 धावांची नाबाद खेळी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अवघ्या काही तासापूर्वीच केलेल्या तिच्या या खेळीने सर्व संघांवर प्रभाव टाकला. अखेरीस दिल्लीने सर्वांना पछाडत तब्बल 2 कोटी 20 लाखांची बोली तिच्यावर लावली. तिच्यासह या संघात भारताची आक्रमक सलामीवीर शफाली वर्मा व ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग खेळताना दिसेल.
(Jemimah Rodrigues Play For Delhi Capitals In WPL)