---Advertisement---

‘मला स्म्रीती किंवा हरमनप्रीत बनायचं नाही’, भारतीय खेळाडूची प्रतिक्रिया वेधतेय लक्ष

Jemimah Rodrigues
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाने कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा मिळवून देण्यात रेणुका सिंग, स्म्रीती मंधाना यांच्यासह जेमिमाह रोड्रिगेज हिचाही मोठा हात राहिला. तिने बार्बाडोसविरुद्धच्या करा अथवा मरा सामन्यात उपयुक्त अशी अर्धशतकी खेळी केली आणि संघाला १०० धावांनी विजय मिळवून देण्यात योगदान दिले. यानंतर जेमिमाहने स्वत:च्या फलंदाजी आणि संघातील भूमिकेबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. 

जेमिमाह (Jemimah Rodrigues) तिच्या मजबूत बाजूंना चांगल्या पद्धतीने समजते. तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) किंवा स्म्रीती मंधानासारखी (Smriti Mandhana) पावर हिटर बनण्यासाठी आपल्या नैसर्गिक खेळात बदल करण्याची गरज नसल्याचे जेमिमाहने म्हटले आहे. तिने बार्बाडोसविरुद्ध ४६ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५६ धावा केल्या होत्या.

बार्बाडोसविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना जेमिमाह म्हणाली की, “स्म्रीतीने २०१९ महिला टी२० चॅलेंजदरम्यान मला म्हटले होते की, तू हरमनप्रीत किंवा स्म्रीती बनण्याचा प्रयत्न नको करू. तू जेमिमाहच राहा. मला वाटते की, मी माझी भूमिका समजून घेतली आणि यामुळे मला खूप मदत मिळत आहे. संघाने माझ्यावर एक भूमिका सोपवली आहे. जर मी ही भूमिका व्यवस्थितपणे पार पाडू शकत असेल तर लोक याबद्दल काय विचार करतात याने मला फरक पडत नाही. जर यामुळे माझ्या संघाला फायदा होत असेल तर, आमच्याकडे शेफाली, स्म्रीती आणि हरमन आहेत. त्यामुळे मी फक्त माझ्या भूमिकेला सर्वश्रेष्ठ पद्धतीने निभावू इच्छित आहे.”

जेमिमाहने हे स्विकार देखील केले की, ती पावर हिटर नाही. परंतु क्रिकेटच्या या स्वरूपात आपले अधिकाधिक योगदान देण्यासाठी ती आपल्या या कौशल्यावर जास्त लक्ष देईल. “निश्चितपणे मी विस्फोटक खेळी खेळण्यावर काम करत आहे. परंतु यापेक्षाही जास्त महत्त्वाचे हे आहे की, मी माझ्या खेळाला समजून घेतले आहे. मी पावर हिटर नाही. परंतु १-२ धावा घेण्यासाठी चांगले फटके नक्कीच खेळू शकते. मला माहिती आहे की, कशा धावा बनवायच्या आहेत. मला वाटते की, हीच माझी मजबूत बाजू आहे,” असे ती म्हणाली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

CWG 2022: श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी! लांब उडीत सिल्वर जिंकणारा पहिलाच भारतीय पुरूष ऍथलेटिक्स

‘पाकिस्तान संघात खेळण्यासाठी लागते वशिलेबाजी?’ माजी दिग्गजाने ‘या’ खेळाडूच्या निवडीवरून साधला निशाणा

हॉकीच्या मॅचदरम्यान खेळाडूंमध्ये रंगली कुस्तीची लढत, मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---