---Advertisement---

‘पाकिस्तान संघात खेळण्यासाठी लागते वशिलेबाजी?’ माजी दिग्गजाने ‘या’ खेळाडूच्या निवडीवरून साधला निशाणा

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 1:20 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बुधवारी (३ ऑगस्ट) आशिया चषका आणि आगामी नेदरलंड दौऱ्यासाठी त्यांचा संघ घोषित केला. आशिया चषकाची सुरुवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी पाकिस्तान संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. असे असले तरी, पाकिस्तानचा माजी कर्णधार दानिश कनेरिया याने संघाच्या निवड प्रक्रियेवर मोठा आरोप केला आहे. संघात निवडल्या गेलेल्या एका खेळाडूविषयी त्याने नाराजी व्यक्त केली. 

दानिश कनेरिया (Danish kaneria) त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. आगामी आशिया चषकासाठी निवडल्या गेलेल्या प्रश्नावर त्याने काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. संघात इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याला संधी दिली गेल्यामुळे कनेरिया चांगलाच संतापल्याचे पाहिले गेले. कनेरियाच्या मते इफ्तिखारला कुणाच्यातरी शिफारसीमुळे संघात घेतले गेले असावे.

कनेरिया वाटते की, अफ्तिखार पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र नाहीये.  तो म्हणाला की, “या अफ्तिखार अहमदचं काय करायचं आहे. हा कुणाच्या सांगण्यावरून आला आहे. कुणाच्या वशिल्यावर क्रिकेट खेळत नाहीये. याला कोण खेळवतं आणि कोण याला संघात घेतं. कशाच्या बेसवर याला संघात घेतले जात आहे. याचा काहीच पाया नाहीये. संघात संधी मिळण्यासाठी हा पात्र नाही, हे स्पष्ट आहे. त्याने कुठे चांगले प्रदर्शन केलंच नाहीये.”

दरम्यान, पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याला आशिया चषक आणि नेदरलंड दौऱ्यासाठी संघात निवडले गेले नाहीये. कनेरिया निवडकर्त्यांच्या या निर्णयाशी देखील सहमत नाहीये. तो म्हणाला की, “शोएब एक चांगला आणि अनुभवी पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. त्याने मागच्या टी-२० विश्वचषकात खूप सामने जिंकवले आहेत. अशात त्याला संघातून वगळणे माझ्या आकलनापलीकडे आहे. त्याला टी-२० विश्वचषकासाठी निवडले गेले पाहिजे. मात्र, आशिया चषकात शोएब खेळत नाही, याचा अर्थ असाच आहे की, टी-२० विश्वचषकात त्याला निवडले जाण्याची शक्यता नाही.”

दरम्यान, आगामी आशिया चषक श्रीलंकेत खेळवला जाणार होता, पण त्याठिकाणी सध्या राजकीय आणि आर्थिक संकट उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता ही स्पर्धा यूएईत खेळवली जाणार आहे. आशिया चषकानंतर सर्व संघांसाठी महत्वाची स्पर्धा म्हणजे आयसीसी टी-२० विश्वचषक. ऑस्ट्रेलियन संघ यावर्षी टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

बडे मिया.. छोटे मिया सुभानल्ला! मिचेल स्टार्कच्या भावाने कॉमनवेल्थमध्ये जिंकले सिल्वर मेडल

मोहम्मद शमीच्या टी२० कारकिर्दीवर नेहमीसाठी ब्रेक? निवडकर्त्यांनी कारण सांगून बसवलंय बाहेर

सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये केली विक्रमी मेडलची कामगिरी, भारताला जिंकून दिले कॉमनवेल्थ गेम्सचे सहावे गोल्ड

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---