वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये सोमवारी (20 मार्च) दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा खेळला गेला. गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या या संघातील या लढतीत पहिल्या डावात दिल्लीने आघाडी घेतली. दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिल्या क्रमांकावरील मुंबईच्या फलंदाजांना निष्क्रिय ठरवत केवळ 109 धावांवर रोखले. यादरम्यान दिल्लीच्या क्षेत्ररक्षकांनी उत्तम क्षेत्ररक्षण केले. दिल्लीची उपकर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज हिने यावेळी एक शानदार झेल टिपला.
A stunning catch, Jemi 🔥pic.twitter.com/cAuZXyA1o5
— Johns. (@CricCrazyJohns) March 20, 2023
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्याच षटकात हा निर्णय योग्य ठरला. आतापर्यंत स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केलेल्या यास्तिका भाटिया व नॅट सिव्हर-ब्रंटला मारिझान कापने सलग चेंडूंवर बाद करत मुंबईची घसरगुंडी घडवली. त्यानंतर पुढील षटकातील तिसऱ्या चेंडूवर शिखा पांडे हिने हायली मॅथ्यूजला माघारी पाठवले. मात्र, चर्चा झाली ती जेमिमा रॉड्रिग्जने घेतलेल्या झेलाची.
मॅथ्यूने लॉंग ऑनला चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीसा हवेत असलेला हा चेंडू क्षेत्ररक्षण करत असलेल्या जेमिमाने उजव्या बाजूला झेप मारत हा झेल पूर्ण केला. हा स्पर्धेतील सर्वोत्तम झेल असल्याचे सांगितले. तिने यापूर्वी देखील देखील असाच एक झेल टिपला आहे.
ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीसाठी मरिझान कापने मुंबईला सुरुवातीला दोन धक्के दिले. 21 धावांवर मुंबईने आपले चार प्रमुख फलंदाज गमावले होते. यानंतर हरमनप्रीत कौरने 23, पुजा वस्त्राकारने 26 व इझी वॉंगने 23 धावा केल्याने मुंबईला शंभरी पार करता आली. दिल्लीसाठी काप, जेनासन व शिखा पांडेने प्रत्येकी दोन बळी मिळवले. हा सामना जिंकून दिल्लीने अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली.
(Jemimah Rodrigues Takes Stunner Against Mumbai Indians WPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ग्रेस’फुल विजयासह युपी वॉरियर्झ WPL एलिमिनेटरमध्ये! आरसीबी-गुजरात स्पर्धेबाहेर
जय भोलेनाथ! विराट-राहुलनंतर उमेश यादवही पोहोचला महाकालेश्वराच्या दरबारी, भल्या पहाटे घेतले दर्शन