---Advertisement---

आता हॉकी खेळणार भारतीय संघातील विस्फोटक फलंदाज, वर्ल्डकप संघातून मिळालाय डच्चू

On: मंगळवार, फेब्रुवारी 8, 2022 12:40 PM
Jemimah Rodrigues
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी आगामी महिला विश्वचषक स्पर्धेसाठी (icc women’s World Cup)  भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात काही मोठ्या नावांना वगळण्यात आले होते. त्यापैकीच एक नाव म्हणजे जेमीमा रॉड्रिग्ज (jemimah Rodrigues) . क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारी जेमीमा रॉड्रिग्ज आता हॉकीच्या मैदानावर गोल करताना दिसून येणार आहे.

जेमीमा रॉड्रिग्ज मुंबईतील विलिंग्डन कॅथोलिक जिमखाना रिंक स्पर्धेत अंकल्स किचन युनायटेड स्पोर्ट्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघाने इंस्टाग्रामवर भारतीय फलंदाजासोबतचा एक फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये जेमीमाच्या हातात हॉकी स्टिक असल्याचे दिसून येत आहे. ही स्पर्धा ११ फेब्रुवारी पासून ते १६ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. जेमीमाला हॉकी खेळाची खूप आवड आहे. तिने शालेय स्तरावर हॉकी स्पर्धेत अनेकदा सहभाग घेतला होता. तसेच वयाच्या ९ व्या वर्षी तिने महाराष्ट्राच्या १७ वर्षाखालील संघात स्थान मिळवले होते.  (Jemimah Rodrigues will play hockey tournament)

भारतीय संघाची विस्फोटक फलंदाज जेमीमा रॉड्रिग्जने आतापर्यंत भारतीय संघासाठी २१ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिने १९.७ च्या सरासरीने ३९४ धावा केल्या आहेत. तर ५० टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २७.१ च्या सरासरीने १०५५ धावा केल्या आहेत.

येत्या मार्च – एप्रिल महिन्यात न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जेमीमा रॉड्रिग्जला संधी देण्यात आली नाहीये. ज्यामुळे निवडकर्त्यांवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते. ती ७-८ वर्षांची असताना, चर्चच्या फादरने तिला हॉकी स्टिक दिली होती. त्यानंतर तिने शालेय स्तरावर हॉकी आणि क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावले होते.

असा आहे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग ठाकूर, तानिया भाटिया. (याष्टिरक्षक ), राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव.

राखीव खेळाडू: एस मेघना, एकता बिश्त, सिमरन दिल बहादूर.

महत्वाच्या बातम्या :

कायरन पोलार्ड स्लेज करत सूर्यकुमारला काय म्हणाला होता? स्वतः सूर्यकुमारने केला खुलासा

राज बावा सह कुटुंबातील या सदस्याने मिळवला होता अंडर १९ WC फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार, पाहा कोण आहे तो..

भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता! टी२० विश्वचषक सामन्याची ४ तासात विकली गेली ‘एवढी’ तिकिटं

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---