भारतीय महिला संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज ती सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये खेळत आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या जेमिमाने आपल्या नॉदर्न सुपरचार्जर्स संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, आता तिला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत झालेल्या दुखापतीसह खेळण्याचा निर्णय आता तिच्याच अंगलट आल्याचे दिसून येतेय.
जेमिमा रॉड्रिग्ज बर्मिंघम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसली होती. त्यानंतर ती द हंड्रेड लीगच्या दुसऱ्या हंगामात नॉदर्न सुपरचार्जर्स संघासाठी खेळली. हंगामातील पहिल्या सामन्यात तीने ओव्हल इनविन्सिबल सांगा विरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली होती. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेत बार्बाडोसविरुद्ध झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज शकीर सेलमनचा चेंडू तिच्या मनगटावर लागला होता. तिच्या त्याचं दुखापतीने आता उचल खालली असून, तिला हंगामाच्या मध्यातून बाहेर व्हावे लागले आहे. तिच्या जागी आयर्लंडच्या गॅबी लुईसला बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. लुईस सध्या नेदरलँडविरुद्धची मालिका खेळत असल्याने दोनच सामने ती नॉदर्न सुपरचार्जर्ससाठी खेळेल. लुईस मागील वर्षी देखील बदली खेळाडू म्हणून या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यावेळी सदर्न ब्रेव्हज संघाकडून खेळणाऱ्या भारताच्याच स्मृती मंधानाची जागा तिने घेतली होती.
हंड्रेड लीगमधून बाहेर झाली असली तरी, जेमिमा भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यासाठी तंदुरुस्त होण्यावर लक्ष केंद्रित करेल. भारतीय महिला संघ सप्टेंबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन वनडे व तीन टी२० सामने खेळेल. दौऱ्याला १० सप्टेंबरपासून सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
केरळचा इंजिनीयर बनला युएईचा कॅप्टन! आता भारताशीच करणार दोन हात
‘भारताचा इतिहास, पण आशिया चषक पाकिस्तानच जिंकणार!’ माजी कर्णधाराने दिलं संदर्भासहित स्पष्टीकरण
फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा अख्तर वापरतोय ‘कुबड्या’, वाचा कशामुळे आली ही वेळ