---Advertisement---

’18 नंबरची जर्सी माझी चॉईस नव्हती’, विराटने सांगितलं काय आहे अनोखं कनेक्शन

On: गुरूवार, मे 18, 2023 7:38 PM
virat kohli Jersey no 18
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली नेहमीच 18 क्रमांकाच्या जर्सीसह खेळताना दिसला आहे. अनेकांचा असा समज असेल की, विराट कोहलीने काही विशेष कारणास्तव हा क्रमांक निवडला असेल. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराटने खुलासा केला की, या नंबसोबत आधी कुठलाच खास संबंध नव्हता. पण नंतर विराटने त्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना याच तारखेला घडल्या.

विराट कोहली (Virat Kohli) आणि 18 क्रमांकाची जर्सी या दोघांनी जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळे स्थान आहे. खेळाडू शक्यतो आपल्या आयुष्याशी निवडीत किंवा एखादा खास क्रमांक आप्लाय जर्सीसाठी निवडतात. विराटने देखील असेच काहीसे कारण असल्यामुळे 18 क्रमांक निवडला असावा, असे अनेकांना वाटते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. विराट कोहलीले कधीच 18 क्रमांकाच्या जर्सीसाठी खास मागणी केली नव्हती. 19 वर्षांखाली भारतीय संघासाठी पदार्पण करताना त्याला अचाणक हा क्रमांक मिळाला, जो आजपर्यंत कामय आहे.

एका माध्यमाला नुकतीच विराटने मुलाखत दिली. यावेळी 18 क्रमांकाच्या जर्सीविषयी त्याला प्रश्न विचारला गेला. यावर विराटने उत्तर दिले की, “खरं सांगायचं झालं तर हा माझ्यासाठी फक्त एक क्रमांक होता. जेव्हा मी भारताच्या 19 वर्षांखालील संघाची जर्सी पाहिली, तेव्हा त्यावर 18 क्रमांक लिहिला होता. मी कधीच हा क्रमांक मागितला नव्हता. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा जर्सीच्या माग माझं नाव आणि क्रमांक लिहिला होता.”

“हा क्रमांक मला दिला गेला होता. पण नंतर हा माझ्या आयुष्यातील खूपच महत्वाचा क्रमांक बनला. भारतीय संघासाठी मी 18 ऑगस्ट 2008 रोजी पदार्पण केलं होतं. तसेच माझ्या वडिलांचे निधन 18 डिसेंबर 2006 रोजी झालं होतं. माझ्या आयुष्यातील दोन सर्वात मोठ्या तारखा या 18च आहेत. पण हा क्रमांक मला आधीच मिळाला होता, त्यामुळे या ब्रम्हाण्डाने मला हा क्रमांक दिला, असे मी मानतो.” (‘Jersey number 18 was not my choice’, Virat said what is a unique connection)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसके प्रशिक्षकाचे मैदानात पुनरागमन! धोनीचा सहकाऱ्याने नाईट रायडर्स फ्रँचायझीसोबत मिळवला हात
‘जवळच्या आणि प्रिय लोकांनीही साथ सोडली’, निवड समितीचे अध्यक्षपद गेल्यानंतर चेतेश शर्मा अडचणीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---