मंगळवारी भारतीय महिला संघाने श्रीलंका महिला संघाविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामन्यात 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
या सामन्यात भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आणि वनडे कर्णधार मिताली राजने खास विक्रम रचला आहे.
झुलनने या सामन्यात 13 धावात 2 विकेट्स घेतल्या. याचबरोबर तिने आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
तिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 252 सामने खेळताना 301 विकेट्स घेतल्या आहेत. यात तिने 170 वनडे सामन्यात 205 विकेट्स , 10 कसोटी सामन्यात 40 विकेट्स आणि 68 टी20 सामन्यात 56 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तिने नुकतेच काही दिवसांपूर्वी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.
याबरोबरच मिताली राज ही सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणारी महिला कर्णधार ठरली आहे. मंगळवारी पार पडलेला श्रीलंकेविरुद्धचा वनडे सामना हा मितालीचा कर्णधार म्हणून 118 वा वनडे सामना होता.
हा विक्रम करताना तिने इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्डला मागे टाकले आहे. एडवर्डने 117 वनडे सामन्यात इंग्लंड महिला संघाचे नेतृत्व केले आहे. या दोघींनीही प्रत्येकी 72 सामन्यात विजय मिळवले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या महिला गोलंदाज-
301 विकेट्स – झुलन गोस्वामी
252 विकेट्स – अनिसा मोहम्मद
244 विकेट्स – एलिस पेरी
240 विकेट्स – कॅथरिन फिट्झपॅट्रिक
239 विकेट्स – जेनी गन
सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व करणाऱ्या महिला कर्णधार-
118 सामने – मिताली राज
117 सामने – शार्लोट एडवर्ड
101 सामने – बेलिंडा क्लार्क
76 सामने – सुझी बेट्स
74 सामने – मेरिसा अॅग्युलेरा
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती
–भारतीय प्रशिक्षक ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून देण्यास असक्षम- विनेश फोगट
–अॅलिस्टर कूकच्या कारकिर्दीचा शेवट गोड; जे सचिन, द्रविडलाही जमले नाही ते कूकने करुन दाखवले
–कूक-पीटरसनमध्ये मैत्रीचे नवे पर्व?