---Advertisement---

नाद करा पण आमचा कुठं! गोलंदाज झुलन गोस्वामीची विश्वविक्रमी कामगिरी, आजवर कोणालाही नाही जमली

On: रविवार, जुलै 4, 2021 8:10 AM
---Advertisement---

भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात शनिवारी (३ जुलै) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय कर्णधार मिताली राजच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी राखून विजय मिळवला. तसेच भारतीय संघाची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी हिने पहिल्या डावात गोलादांजी करताना विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून झुलन गोस्वामी ही भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाची भूमिका बजावत आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात तिला ९ षटके गोलंदाजी करताना १ गडी बाद करण्यात यश आले. परंतु तिने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती २००० पेक्षा अधिक षटके गोलंदाजी करणारी पहिली गोलंदाज ठरली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तिने ३४९ षटक गोलंदाजी केली आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये तिने १५०० पेक्षा अधिक षटक गोलंदाजी केली आहे. याचबरोबर टी-२० क्रिकेटमध्ये तिने २२५ षटक गोलंदाजी केली आहे. सर्व मिळून तिने २००० षटके गोलंदाजी केली आहे. (Jhulan Goswami becomes the first ever woman Cricketer to bowl 2000 overs in international cricket)

इंग्लंड संघाला आले २१९ धावा करण्यात यश
मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे हा सामना ४७-४७ षटकांचा खेळवण्यात आला होता. इंग्लंड संघाकडून सिवरने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली होती. तर इंग्लंडची कर्णधार हिदर नाईटने ४६ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ गडी बाद केले. इंग्लंड संघाचा डाव २१९ धावांवर संपुष्टात आला होता.

भारतीय संघाने मिळवला जोरदार विजय
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावांची आवश्यकता होती. भारतीय संघाकडून कर्णधार मिताली राजने सर्वाधिक नाबाद ७५ धावांची खेळी केली तर स्म्रिती मंधानाने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ४ गडी राखून विजय मिळवला मिळवण्यात यश आले. परंतु ही मालिका इंग्लंड संघाने २-१ ने आपल्या नावावर केली.

महत्वाच्या बातम्या-

थरारक सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय, मितालीची ‘रेकॉर्डब्रेक’ नाबाद खेळी, स्नेह राणाची पुन्हा चमक

पृथ्वी शॉ इंग्लंडला गेला तर कोण असेल धवनचा सलामी जोडीदार? ‘ही’ ३ नावे आहेत शर्यतीत

ओली रॉबिन्सनच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा, ८ सामन्यांची बंदी असूनही भारताविरुद्ध खेळणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---