---Advertisement---

रिचर्डसनची एक विकेट पंजाबला पडली साडेचार कोटीला; तर हर्षल सर्वात स्वस्त; जाणून घ्या सविस्तर

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 7:11 PM
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत व्यवसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाची अखेर शुक्रवारी(१५ ऑक्टोबर) झाली. चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत आपले चौथे आयपीएल विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर आता आयपीएल दरम्यान घडलेल्या अनेक चकित करणाऱ्या आकडेवारी समोर येऊ लागल्या आहेत. आज आपण आयपीएल २०२१ मध्ये सर्वात महाग ठरलेल्या गोलंदाजांच्या कामगिरीविषयी जाणून घेणार आहोत.

रिचर्डसन आणि मेरिडिथ ठरले महागडे
या हंगामाच्या एकूण ६० सामन्यांमध्ये ९० गोलंदाजांनी ७१६ बळी घेतले. यातील २० गोलंदाजांना एकही बळी मिळवता आला नाही नाही. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा हंगामातील सर्वात महागडा गोलंदाज होता, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात सर्वाधिक १५.५० कोटी रुपयांना खरेदी केलेले. यानंतर पंजाबचा झाय रिचर्डसन सर्वात महागडा गोलंदाज ठरलेला. त्याला पंजाबने १४ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

मात्र, संघाला रिचर्डसनला खरेदी करणे चांगलेच महागात पडले. त्याने हंगामात फक्त तीन सामने खेळले आणि तीन बळी मिळविले. संघासाठी त्याच्या एका बळीची किंमत तब्बल ४.६ कोटी रुपये होती. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाबच्याच रायली मेरीडिथचे नाव आहे. त्याला लिलावात आठ कोटी रुपये किंमत मिळाली होती. मात्र, त्याला पाच सामन्यात फक्त चार बळी मिळवता आले. संघासाठी त्याच्या एका बळीची किंमत दोन कोटी रुपये होती.

हर्षलचा एक बळी ६५ हजाराचा
या हंगामामध्ये सर्वाधिक ३२ बळी मिळवून बेंगलोरचा हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी ठरला. बेंगलोरने त्याला हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रेड केले होते. त्याच्या एका बळीची किंमत अवघी ६५ हजार इतकी राहिली.

त्याचबरोबर पंजाबच्या अर्शदीप सिंगने १२ सामन्यात १८ बळी मिळवले. पंजाबने त्याला २० लाख रुपयांमध्ये कायम ठेवले होते. त्याच्या एका बळीची किंमत १.११ लाख रुपये होती. या यादीमध्ये दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला दिल्लीने ७० लाख रुपयांना विकत घेतलेले. आवेशने या हंगामात २४ बळी घेतलेले. त्याच्या एका बळीची किंमत २.९१ लाख रुपये इतकी झाली.

महत्त्वाच्या बातम्या-

अंबाती रायुडूने झेल घेऊनही गिल ठरला होता नाबाद; कसं ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘हा’ व्हिडिओ

‘माही’ची खिलाडूवृत्ती! पराभवानं निराश झालेल्या मॉर्गनला धोनीनं दिलं प्रोत्साहन, पाहा व्हिडिओ

‘हे’ आहेत आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील ‘सिक्सर किंग’, ख्रिस गेलने विक्रमी ४ वेळा केलाय हा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---